Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६) गीता सांगण्याचे निमित्त आता श्रीकृष्णाने कोणत्या निमित्ताने अर्जुनास गीता सांगितली ते पाहू. वनवासाहून परत आल्यानंतर पांडवांनी रीतसर आपला राज्याचा अर्धा वाटा मागितला. दुर्योधनाने त्यास साफ नकार दिला. तरी युध्द टाळण्यासाठी युधिष्ठिराने पाच गावांची मागणी केली व बोलणी करण्यासाठी कृष्णास पाठवले. पण ही कृष्णशिष्टाई व्यर्थ गेली. आणि युध्द करण्याव्यतिरिक्त पांडवाकडे दुसरा मार्ग शिल्लक राहीला नाही. युध्दाच्या दिवशी सकाळी दोन्ही पक्षांची सैन्ये कुरुक्षेत्रावर दाखल झाली. तेव्हा आपल्याला कोणाकोणांशी लढावयाचे आहे हे पहाण्यासाठी अर्जुनाने कृष्णास आपला रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ उभा केला. अर्जुनाने दोन्ही सैन्यावर नजर टाकली. तेव्हा त्याला आपले काका, आजोबा. गुरुजी, भाऊ, पुत्र. नातू, मित्र सासरे व इतर नातेवाईक लढाईसाठी आलेले दिसले. या दृश्याचा त्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. यःकश्चित हस्तिनापुराच्या राज्यासाठी या वडीलमंडळींना ठार मारण्याच्या नुसत्या कल्पनेनेच तो गांगरुन गेला. - तो व्याकुळ होऊन कृष्णाला म्हणाला – "केशवा, ह्या युध्दात आपल्या या लोकांना मारुन काही कल्याण होईल असे मला वाटत नाही. मला युध्दात विजय मिळवण्याची इच्छा नाही. मला राज्य व सुखोपभोग नकोत, त्यांचा काय उपयोग आहे ? ज्यांच्यासाठी आपण राज्य मिळवायचे विजय संपादन करावयाचा तेच माझ्याशी लढाई करण्यास सज्ज झालेले आहेत. आता ह्यानी मला ठार मारले तरी हरकत नाही पण त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी मला ते नको आहे. या कौरवांना मारुन आम्हाला आनंद होणार नाही उलट आम्ही पापानेच वाटकरी होऊ. कारण आपल्याच बांधवांना मारुन आम्हाला सुख कसे लाभेल ? या मुळे आपल्या साऱ्या धर्माचा नाश होणार आहे. कुळाचा नाश झाला की सनातन धर्माचा नाश होतो अधर्म बोकाळतो. कुळातील स्त्रिया बिघडतात. त्या अनाचार करू लागतात त्यामुळे त्यांचे पितर नरकात खितपत पडतात. खरेच आम्ही केवढे मोठे पातक करण्यास उद्युक्त PETENSKA गीता रहस्य : एक अध्ययन