ख्रिस्ती बायबल याविषयीहि उद्बोधक विवेचन केले आहे. ही माहिती गीतेच्या सर्वांगीण अभ्यास करणान्यास मार्गदर्शक ठरणारी आहे. या पूर्वीच्या कोणत्याही तत्वज्ञानपर ग्रंथात ती आलेली नाही. ज्याना टिळकांचे सिध्दान्त मान्य नाहीत. त्यानी देखील या भागाचे जरुर परिशीलन करावे, एवढी याची योग्यता आहे. आपल्याकडील सुशिक्षित लोकांना गीतेतील शास्त्रार्थ जुन्या पध्दतीने सांगितल्यास तो पटणार नाही. तो युरोपियन तत्वज्ञान्यांच्या पध्दतीने सांगण्याची गरज आहे, हे त्यानी ओळखले होते. या ग्रंथाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ अत्यंत सुबोध भाषेत लिहिला आहे. साधारणतः तत्वज्ञानावरील ग्रंथ बोजड अथवा क्लिष्ट भाषेत लिहिलेले आढळतात. त्यांच्या काळात प्रो भानू भाऊशास्त्री लेले, विष्णूशास्त्री बापट, श्री कोल्हटकर, आहिताग्नि राजवाडे यानीही गीतेवर ग्रंथ लिहिले आहेत. त्यातील भाषेची गीतारहस्याच्या भाषेची तुलना करुन पहाण्यासारखी आहे. अशा रीतीने ग्रंथाची खरी योग्यता जाणल्यावर सुबुध्द वाचक टिळकांनी अमुक श्लोकाच्या अर्थाची ओढाताण केली आहे. त्यांचे तत्व प्रतिपादन वकिली थाटाचे आहे, असे मामुली विचार मनात आणणार नाही. हे आक्षेप शंकराचार्य व टिळक या दोघानीही केलेल्या श्लोकांच्या अर्थावर घेता येतात. पण दोघांचे कार्य लक्षात घेतले तर असल्या विचारांना थारा मिळणार नाही. गीतारहस्यापूर्वीचे दोन ग्रंथ टिळकांनी इंग्रजी भाषेत लिहिले आहेत पण हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला आहे. पहिल्या दोन ग्रंथाचा विषय संशोधनपर आहे व त्या बाबतीत पाश्चात्य संशोधक हेच त्यांचे प्रतिपक्षी होते. त्यामुळे त्यानी ते ग्रंथ इंग्रजीत लिहून त्याना उत्तरे दिली. पण गीतारहस्य हा ग्रंथ भारतीयासाठी विशेषतः मराठी माणसासाठी लिहिलेला आहे. पाश्चात्याना कर्मयोग शिकविण्याची गरज नाही. ते कर्मयोगीच आहेत. असे त्यांचे मत आहे. गीता रहस्य : एक अध्ययन g
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/३२
Appearance