Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५) गीतारहस्याची थोरवी आता सर्वसाधारणपणे गीतारहस्याची थोरवी कशात आहे. ते पाहू. 'गीतारहस्य हे टिळकांचे शाश्वत स्मारक आहे' असे महात्मा गांधीनी म्हटले आहे तर "हा मराठीतील पहिल्या प्रतीवर प्रचंड गद्यग्रंथ आपल्या सूक्ष्म व व्यापक विचार प्रणाली व प्रभावी लेखनशैलीने अभिजात वाड़मयात समाविष्ट झाला आहे. असे गौरोवोद्गार योगी अरविंदानी काढले आहेत. हा युगप्रवर्तक ग्रंथ आहे असे प्रा. न. र फाटकांनी म्हटले आहे. मी ज्या शतकात जन्माला आलो आहे त्या शतकाला भूषणभूत होणारा ग्रंथ लिहिणार आहे असे लोकमान्यांचे उद्गारही फाटकांनी उद्धृत केले आहेत. (लोकमान्य पृष्ठ ३६५ ) लोकमान्यांचे गीतेवरील भाष्य जुन्या पध्दतीच्या भाष्यापेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहे. शंकर रामानुजादी संस्कृत भाष्यकारानी अथवा ज्ञानेश्वर वामन पंडितादि मराठी संतकवींनी आपले विचार प्रत्येक श्लोकावर टीका लिहून व्यक्त केले आहेत. शांकरभाष्यात प्रारंभी लहानशी प्रस्तावना व शेवटी उपसंहार हे आढळतात. पण तरीही त्यानी आपले मुख्य विचार प्रतिपक्षाचे खंडन इत्यादी श्लोकावरील टीकेत मांडले आहे. टिळकांनी आपले विचार श्लोकावर टीका अशा स्वरुपात मांडलेले नाहीत. प्रत्यक्ष श्लोकाला प्रारंभ करण्यापूर्वी जोडलेला पाचशे पंचावन्न पृष्ठांचा प्रबंध हा अक्षर वाड़मयात जमा होण्यासारखा आहे. यात पंधरा सोळा प्रकरणात त्यानी गीतेतील प्रमुख व सिध्दांत यांची प्रकरणवार विभागणी करुन सविस्तर चर्चा केली आहे. यातील सुख, दुःख विवेक, विश्वाची उभारणी व संहारणी, अध्यात्म कर्मविपाक व आत्मस्वातंत्र, संन्यास व कर्मयोग, सिध्दावस्था व व्यवहार ही प्रकरणे अत्यंत महत्वाची आहेत. गीतेच्या बहिरंग परीक्षणात गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे,भागवत धर्माचा उदय व गीता, हल्लीच्या गीतेचा काळ या विषयी दुर्मिळ माहिती गोळा करून दिली आहे इतकेच नव्हे तर गीता व बौध्द ग्रंथ आणि गीता व गीता रहस्य : एक अध्ययन PR