Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनोगत १९६३ साली एस.वाय.बीए. च्या वर्गात असताना आम्हाला संपूर्ण भगवद्गीता लावलेली होती. डॉ. इनामदार सर ती शिकवत होते. एकदा बोलता बोलता ते म्हणाले, ‘‘गीतेविषयी भरपूर माहिती हवी असेल तर तुम्ही गीतारहस्य वाचा.' लोकमान्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना ह्या थोर ग्रंथाची रचना केली असे मी फ क्त ऐकले होते. पण तो ग्रंथ माझ्या पहाण्यात नव्हता. घरी मी वडिलांच्याबरोबर गीतेवर चर्चा करीत असे. त्यांनी गीतेवरील थोडे फार शांकरभाष्य वाचलेले होते तसेच ज्ञानेश्वरी काळजीपूर्वक वाचली होती. पण गीतारहस्य वाचले नव्हते. मी त्यावेळी प्रा. श्री. मा. कुलकर्णी यांचे सर्वसंग्राहक गीता डॉ.चि.ञ्य.केंधें यांचे गीता एक अध्ययन व विनोबांची गीता प्रवचने यांच्या आधारे अभ्यास करीत होतो. मी सरांचे म्हणणे त्यांच्या कानावर घातले. त्सानंतर दोन चार दिवसांनी संध्याकाळच्या वेळी मी अभ्यास करीत बसलो असता वडिलांनी माझ्या हातात एक पुडके दिले. मी पुडके उघडून पाहिले तर गीतारहस्याची कोरी करकरीत प्रत !! माझा आनंद गगनात मावेना. महिन्या दीड महिन्यातच मी तो अप्रतिम ग्रंथ वाचून काढला. टिळकांच्या अलौकिक बुध्दिमत्तेचे व व्यासंगाचे त्यातून दर्शन घडले. गीतेच्या तत्वप्रतिपादनातील बऱ्याच भागांचे टिळकांचे भाष्य वाचून आकलन झाले. व गीतारहस्य हे गीतेवरील सर्वोत्तम भाष्य आहे ' असे जे माझे मत झाले ते आज पन्नास वर्षानंतरही कायम आहे. वडिलांचे मत मात्र वेगळे पडले. त्यांना शंकराचार्याची विचारसरणी मान्य होती व ज्ञानेश्वरांनी केलेले विवेचन अधिक ग्राह्य वाटत होते असो. इ.स. १९१२ च्या मार्च महिन्यात गीतारहस्याचा शताब्दि महोत्सव झाला. सांगलीतही टिळक स्मारक मंदिरात डॉ. सदानंद मोरे यांचे प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गीतारहस्यावर व्याख्यान झाले. त्यानिमित्ताने आपण लेख लिहावा, या विचाराने मी टिपणे काढण्यास सुरवात केली. पण काहीतरी निमित्ताने 2212225523RDP498/1988186 गीता रहस्य : एक अध्ययन