Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येत नाहीत. सांख्याच्या सत्कार्यावादात हीच गोष्ट सांगितली आहे. आता भेद जो जाणवतो तो वरवरचा असतो. परमार्थात सारे एकच आहे. हीच गोष्ट वल्लभाचार्याना सांगावयाची आहे. पण अज्ञानामुळे जीवास भेदरुपाची जाणीव होते. नावेत वसलेल्या माणसाला आपण स्थिर असून झाडे मागे जाताना दिसतात. अविद्येमुळे होणारा भ्रम हा जीवाला जगताच्या व्यापारात गुंतवतो. प्रपंचाचे वास्तवरूप एकच असले तरी व्यक्तीच्या योग्यतेनुसार ते वेगवेगळे भासते. वल्लभाचार्यानी तीन प्रकारच्या व्यक्ती विचारात घेतल्या आहेत. (१) ज्याना ब्रह्मज्ञान झालेले आहे त्याना जग हे मूळ स्वरुपात ब्रह्मरुपात दिसते. (२) ज्याना शास्त्राद्वारे जगताचे ज्ञान झाले आहे त्याना जग हे व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ अशा दोन्ही रुपात जाणवते. उदा. स्फटिकाचा तुकडा जास्वंदीच्या फुलाजवळ ठेवला तर तो लालभडक दिसतो. शहाण्या माणसाला स्फटिकाच्या दोन्ही रुपाचे - मुळच्या व बदललेल्या रुपाचे ज्ञान असते. व (३) सामान्य माणसाला जग भासते तसेच दिसते. त्याला स्फटिकाचा तुकडा लाल दिसतो व तो लालच आहे असे त्याला वाटते. B - वल्लभाचार्यानी परब्रह्म हे श्रीकृष्णस्वरूप मानले आहे. त्याची सेवा केल्यानेच जीवाला मोक्ष मिळतो सेवा ही साधनरुप व मनाने केलेली अशा दोन प्रकारची असते. शरीराने केलेली सेवा ही साधनरुप व मनाने केलेली सेवा ही फलरुप असते. मोक्षवस्थेत जीवाला विशेष आनंदाचा लाभ होतो. हिंदीतील प्रख्यात कवी संत सूरदास (इ.स. १४८३ ते १५६३) हे वल्लभाचार्याचे शिष्य होते असं म्हणतात. उपनिषदात व वेदांतसूव्रात मायावादाचा निर्देश नाही. शांकरमतातील अध्यास निरुपण, विवर्तवाद, सर्परज्जू दृष्टांत या गोष्टीना मुळात आधार नाही. तेव्हा मायावादास फाटा देऊन केवल अद्वैताची मांडणी करणारा वल्लभाचार्यांचा सिध्दांत सूत्रकारांच्या अभिप्रायाजवळ जाणारा आहे. मात्र उपनिषदांचे हृदगत हे अद्वैतमत प्रतिपादनात तेवढे प्रतीत होते, तेवढे इतर मतात होत नाही. निंबार्क, मध्व व वल्लभ यानी परब्रह्म कृष्णस्वरुप मानून भक्तीला जे अतिरिक्त महत्व दिले आहे, त्यालाही उपनिषदात आधार नाही. तेव्हा शंकराचार्यानी उपनिषदांचे रहस्य जाणले असल्याने तेच वेदांतसूत्राचे खरे भाष्यकार आहेत. गीता रहस्य : एक अध्ययन