मध्वाचार्यांच्या मते ईश्वर हा अनंत गुणानी युक्त आहे. त्याची आठ कार्ये या प्रमाणे (१) जगताची प्रकृतिद्वारा निर्मिती (२) रक्षण (३) प्रलय (४) नियंत्रण (५) ज्ञान प्रदान करणे (६) अवतार (७) शरीरातील जीवात्मा नष्ट होणे. (८) मुक्ति प्रदान करणे. ईश्वराच्या या आठ कार्याचा निर्देश त्यानी जन्माद्यस्य यत: । (ब्र.सू. १–१–२) या सूनावरील भाष्यात केलाआहे. केवलाद्वैत मताची मांडणी करणारे वल्लभाचार्य हे शके १४०१ (इ.स. १४७९) मध्ये आंध्रप्रांतातील कांकरव या गावात होऊन गेले. त्यानी वेदांतसूत्रावर लिहिलेल्या भाष्याचे नाव अणुभांष्य हे आहे. मात्र हे भाष्य ब्र.सूअ.२.पाद २ सूव्र २३ पर्यंतच लिहून झाले. त्याचा दुसरा मुलगा विठ्ठलनाथ याने ते पुढे पूर्ण केले. शंकराचार्यांप्रमाणे वल्लभाचार्य हे अद्वैतवादी असले तरी त्यांचे अद्वैत हे शुध्द आहे. शुध्द म्हणजे मायाविरहीत ब्रह्म. ब्रह्म हे मायेच्या मदतीशिवाय सृष्टीची निर्मिती करते. ईश्वर, जीवात्मा व जगत हे तत्वदृष्टया एकच आहेत. त्यानी जीव हा अणुप्रमाण मानला आहे. अग्नीतून ठिणग्या पडाव्यात त्याप्रमाणे ब्रह्मातून जीव निष्पन्न झाले आहेत. ते ब्रह्माप्रमाणेच शाश्वत व सत्य आहेत. ते अणुपरिमाण असले तरी सर्व शरीरास व्यापणारे आहेत. ब्रह्म हे जगताचे उपादान कारण आहे व ब्रह्मशक्ती हे निमित्त कारण आहे. ब्रह्माचे सत, चित् व आनंद हे तीनही गुण घटपटादी अचेतन वस्तूत आहेत. आता निर्जीव वस्तूत चैतन्य कसे मानता येईल. या शंकेस लोकमान्यानी उत्तर दिले आहे. दिवा हा काचेच्या पेटीत ठेवला तर दिसत नाही. पण याचा अर्थ दिव्याचे अस्तित्व नाही असा होत नाही. आता ब्रह्म हेच सर्वन भरुन राहीले असेल तर सृष्टीत नानाविधतेचा अनुभव का यावा ? मृत्तिकेपासुन घटच तयार का व्हावा, पट का होऊ नये? चिंचेला आंबा किंवा पेरु ही फळे का लागू नयेत? असे आक्षेप या मतावर येणे शक्य आहे. वास्तविक पहाता कारण आणि कार्य यांच्यात भेद नाही. दुधाचेच दही होते पाण्याचे किंवा तेलाचे होत नाही. डाळिंबाच्या झाडाला डाळिंबेच येतात, सफरचंदे STYTI P. De गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/२५
Appearance