मानतात. परंतू मध्वाचार्य सर्व सूत्रे सिध्दांतपक्षपरच मानतात. ब्रम्हसूत्रावर अनेक भाष्ये व टीका लिहिण्यात आल्या आहेत. टीकेत सूत्राचे स्पष्टीकरण देताना त्यास काही शब्द जोडण्यात येतात. काही वेळा हे शब्द मागच्या सूत्रातून घेतलेले असतात. पण अनेकदा ते स्वतंत्रच असतात. टीकेपेक्षा भाष्य हे अधिक विस्तृत असते. भाष्यकाराने आपल्या संप्रदायानुसार सूत्रांचा अर्थ लावलेला असतो. लोकमान्यानी टीका व भाष्य यांच्यातील फरक चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. "भाष्य व टीका या दोन शब्दांचा कित्येकदा समानार्थी उपयोग करण्यात येतो खरा, पण सामान्यतः टीका म्हटली म्हणजे त्यात मूळ ग्रंथाचा सरळ अन्वय सांगून त्यातील शब्दांचा अर्थ सुगम केलेला असतो आणि भाष्यकार तेवढ्यावरच संतुष्ट नं राहता एकंदर ग्रंथाचे न्यायरीत्या पर्यालोचन करून आपल्या मते त्यातील तात्पर्य काय व तदनुसार ग्रंथाचा अर्थ कसा लावावा हे सांगत असतात. (गीतारहस्य पृष्ट ११) ब्रह्मसूत्रावरील टीकाकारांची सविस्तर यादी प्रा.का.वा. अभ्यंकरांनी ब्रह्मसूत्र भाष्यानुवादाच्या प्रस्तावनेत दिली आहे, ती अशी "या ब्रह्मसूत्रांचे व्याख्याकार भारतीविजय, संविदानंद, ब्रह्मघोष, शतानंद, बौधायन, उद्धृत, विजय, रूद्रभट्ट, यादव प्रकाश,भर्तृप्रपंच, शंकराचार्य, शठकोप, रामानुजाचार्य, ब्रह्मदत्त, भास्कर, पिशशच, विजयमह, विष्णुकांत वादींद्र, पूर्णप्रज्ञ (म्ह. मध्वाचार्य), राघवेंद्रस्वामी, वल्लभाचार्य, विज्ञानभिक्षु, शंकरानंद, श्रीकंठशिवाचार्य श्री शंकर भगवद्पादशिष्य, धर्मभट्ट, व्रजनाथ भट्ट वगैरे अनेक झाले." (ब्र.सू. भाष्य अ. १ पाद १ - प्रस्तावना पृष्ठ १०) वेदांतसूत्रांची एकंदर मांडणी पाहिली तर त्यात कांही तत्त्वे गृहीत धरलेली दिसून येतात. त्यातील वेद- द-प्रामाण्य ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. वेद हे पौरूषेय म्हणजे मनुष्य निर्मित नाहीत त्यामुळे त्यातील वचने त्रिकालाबाधित आहेत, असा दृढ विश्वास आहे. किंबहुना भारतीय तत्वज्ञानाचे हेच मोठे वैशिष्ट्य आहे. श्रुतीच्या खालोखाल स्मृती (म्ह. गीता, मनुस्मृति, याज्ञवल्क्य स्मृति वगैरे) या प्रमाण मानलेल्या आहेत. त्यांनी श्रुती आणि स्मृती यांनाच प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणशसारखे महत्त्व दिले आहे. वेद प्रमाणाशी न जुळणारे ज्ञशच त्यानी ज्ञान गीता रहस्य : एक अध्ययन SAAN
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/२०
Appearance