संस्कृतातच काय पण जगातील इतर वाड़मयातही सापडणे दुर्मिळ होय." (गीता पृष्ठ १) यात श्रीमद् भगवतगीता या शब्दाऐवजी गीतारहस्य व संस्कृतातच काय या शब्दाऐवजी मराठीतच काय हे शब्द घातले म्हणजे हेच वर्णन गीतारहस्याला तंतोतंत लागू पडते. असो. उपनिषदे,गीता ब्रह्मसूत्रे हे ग्रंथ वेदांत तत्वज्ञानाचे मूलभूत आधार ग्रंथ आहेत. यानाच प्रस्थानत्रयी असे नाव आहे. शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहून वेदांत तत्वज्ञानाचा पाया घातला आहे. या मताचा सखोल अभ्यास करु इच्छिणाऱ्यांनी प्रस्थानत्रयीचे अध्ययन करणे नितांत गरजेचे आहे, प्रथम उपनिषदे व ब्रम्हसूत्रे यांचा थोडक्यात परिचय करुन घेऊ. जी गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या अखेरीस की पुष्पिका आहे(..........) तिच्यात इति श्रीमद्भगवतगीतासूःपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे' असे शब्द आहेत.' उपषित्सु ब्रह्मविद्यायाम' म्हणजे उपनिषदात जो अध्यात्म विद्येचा उपदेश आहे तोच गीतेतही आलेला आहे कारण- सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः । पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।।" याचा अर्थ, सर्व उपनिषदे या गाई आहेत भगवान कृष्ण हे त्यांची धार काढणारे गवळी आहेत. बुध्दिमान अर्जुन हा वासरु आहे. व काढलेले दूध म्हजे गीतारुपी अमृत आहे. (गीताध्यान श्लोंक ४) हे गीताध्यान गीतेनंतर बराच काळ लोटल्यानंतर कांणीतरी रचून गीतेच्या प्रारंभी जोडलेले आहे. यात एकंदर नऊ श्लोक असून यातील 'भीष्मद्रोण तटा' हा श्लोक भास कवीच्या (इ. स. दुसरे शतक) 'ऊरुभंग' या नाटकात आला आहे. (ऊरुभंग अंक १ श्लोक १) हा श्लोक गीताध्यानकाराने नाटकातून घेतला असावा असे लोकमान्यांनी म्हटले आहे, ते बरोबर आहे. वर दिलेल्या श्लोकावरुन गीता ही उपनिषदांच्या तोडीची आहे अथवा स्वतंत्र उपनिषदच आहे असे मानलेले दिसते... असो. प्राचीन ऋषीमुनींनी अरण्यात राहून मानवी जीवन व भोवतालची सृष्टी यांचे एकाग्र चित्ताने जे चिंतन केले ते सर्वतोपरी स्वतंत्र होते. अनेक विचारवंतांनी आपल्या गीता रहस्य : एक अध्ययन 2553888888899
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१६
Appearance