Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युध्दास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या गीतेत ब्रह्मज्ञानाने किंवा भक्तीने कसा मोक्ष मिळवावा याचे म्हणजे नुसत्या मोक्षमार्गाने विवेचन कशाला ही शंका मनात येऊन तीव उत्तरोत्तर बळावत चालली". (पृष्ठ १०) ● पुढे त्यांनी शंकर रामानुजादी आचार्यांची भाष्ये वाचली पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. भारतीय, पाश्चात्य तत्व ज्ञानाचा सखोल अभ्यास केला. नंतर सर्व टीका व भाष्ये बाजूला ठेवून स्वतंत्र बुध्दीने गीतेची पारायणे केली ' या चिंतनातून त्यांचे विचार निश्चित होऊ लागले. नंतर त्यांनी या विषयावर चार पाच ठिकाणी जाहीर व्याख्याने दिली. नागपूर येथे दिलेल्या व्याख्यानाचा गोषवारा वर्तमानपत्रातून प्रसिध्दही झाला. श्रीपती बोवा भिंगारकराशी चर्चाही केली. अखेरीस मंडालेच्या तुरुंगात निवांतपणा लाभताच त्यानी ग्रंथलेखनास सुरुवात केली. सारांश, त्यानी अखंड अडतीस वर्षे गीतेवर केलेल्या चिंतनाचा परिपाक म्हणजे प्रस्तुतचा गीतारहस्य हा ग्रंथ होय. (२) उपनिषदे, वेदांतसूत्रे, व गीता " ग्रंथाचे संपूर्ण नाव 'श्रीमद्भगवद्गीता रहस्य' असे आहे. पुस्तकात गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र असे नाव दिले आहे." प्रारंभीच्या पाच सात ओळीत ग्रंथाची उत्कृष्ठ ओळख करून दिली आहे. "श्रीमद्भगवतगीता हा आमच्या धर्मग्रंथापैकी एक अत्यंत तेजस्वी व निर्मल हिरा आहे. पिंड ब्रहमांड ज्ञानपूर्वक आत्माविद्येची गूढ व पवित्र तत्वे थोडक्यात पण असंदिग्ध रीतीने सांगून त्यांच्या आधारे मनुष्यमात्रास आपल्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची म्हणजे परमपुरुषार्थाची ओळख करून देणारा आणि त्या बरोबरच भक्तीची ज्ञानाशी व अखेर त्या दोहोंचीही शास्त्रतः प्राप्त होणाऱ्या व्यवहाराशी सोपपत्तिक व सुंदर जोड घालून संसारात भांबावून गेलेल्या मनास शांत व विशेषतः निष्काम कर्तव्यचरणास प्रवृत्त करणारा, या सारखा दुसरा बालबोध ग्रंथ " गीता रहस्य : एक अध्ययन RP399999999ARASRAEBARMEEN