समर्थन केले आहे. तथापि श्री. शंकराचार्यांच्या भाष्याच्या प्रभावात कर्मयोगपर टीका निष्प्रभावी ठरल्या आधुनिक काळातल्या विद्वानात प्रि. वामन आवाजी मोडक यानी १८७५ साली ‘गीतासार’ म्हणून एक निबंध लिहून तो स्वतंत्रपणे प्रसिध्दही केला होता व त्यात कर्मयोग हाच गीतेचा प्रतिपाद विषय आहे असे विवेचन केले होते, तथापि संन्यासपर गीतेच्या कल्पनेला जबरदस्त धक्का देऊन ती कल्पना निर्मूल ठरवून तिच्या जागी' गीता कर्मयोगपर आहे' हा सिध्दांत तर्कशुध्द पध्दतीने सविस्तर मांडून वद्धमूल करण्याचे अभिनव कार्य लो. टिळकांनीच केले. (गीतातत्वमंजिरी - पृष्ठ २५ ) (४) साहित्यसम्राट न. चि. केळकर 'गीतारहस्या'वर प्रथम अनेक आक्षेप आले तरी एकंदरीने लोकांना उत्तेजन देणारा,कर्मप्रवण करणारा, उद्योगी बनविणारा न बनविणारा, नशिबाला दोष देऊन कपाळाला हात लावून बसणाऱ्यांचा निषेध करणारा, जशास तसे वागणे ही नीती आहे असे सांगून धीर देणारा, असाच आजही गीतारहस्य ग्रंथ नवीन पिढीला वाटेल याविषयी दुमत नाही. व तसे फल या ग्रंथापासून मिळाले तर कोणत्या शब्दाची टिळकांनी किती ओढाताण केली याकडे कोणी लक्ष देईल, असे आम्हास वाटत नाही. त्यांची चूक असली तरी ती शास्त्रीय चूक असेल पण त्या चुकीपासूनही समाजाचे हितच होईल. याविषयी कोणास शंका वाटत नाही. "" ' असो. गीतारहस्य ग्रंथाचे महत्व दुसऱ्या एका दृष्टीने लोक मानतात. मात्र ही दृष्टी इंग्रजी शिकलेल्या लोकांचीच आहे, हे नमूद केले पाहिजे. यांच्या दृष्टीने गीतारहस्य ग्रंथातील पूर्वार्धाचे महत्व उत्तरार्धापेक्षा अधिक आहे गीतेच्या श्लोकांचा शब्दार्थ व त्यावरील टीका किंवा भाष्य या पेक्षा पहिल्या १५–१६ प्रकरणात टिळकांनी तुलनात्मक नीतिशास्त्र व गीतेचे अंतरंग व बहिरंग परीक्षण केले आहे ते खरोखर अपूर्व होय. त्यातल्या त्यात महत्वाची बाब आमच्या मते ही की पाश्चात्य तत्वज्ञान व गीतेतील विचार यांची सांगड टिळकांनी फार चांगली घालून दाखविली. (लो. टिळकाचे चरित्र भाग ७ पृष्ठ ७३ – ७४ ) गीता रहस्य : एक अध्ययन 1
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१३३
Appearance