Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मान्यवरांचे अभिप्राय (१) महर्षी योगी अरविंद " गीता ग्रंथावरील टिळकांची टीका ही केवळ मल्लिनाथी नसून स्वतंत्र प्रबंध आहे व त्यात नैतिक तत्वांचे योग्य निदर्शन आहे. मराठीतील पहिल्या प्रतीचा हा पहिला प्रचंड गद्यग्रंथ आपल्या सूक्ष्म व व्यापक विचार प्रणालीने व सफाईदार प्रभावी लेखनशैलीमुळे अभिजात वाड़मयात समाविष्ट होतो." (गीतारहस्य पृष्ठ ५) (२) महात्मा गांधी कै लोकमान्य टिळकांना आपल्या अभ्यास व विद्वत्ता यांच्या ज्ञानसागराहून गीताप्रसादामुळेच हे दिव्य टीका मौक्तिक मिळाले बुध्दीने शोधावयाच्या व्यापक सत्याचे भांडारच त्यांना गीतेत गवसले. गीतेवरील टिळकांची टीका हेच त्यांचे शाश्वत स्मारक होय. स्वराज्याची लढाई फत्ते झाल्यानंतरही ते टिकूनच राहील. तेव्हा देखील टिळकांचे निष्कलंक चारित्र्य आणि गीतेवरील महान टीका यामुळे त्यांची स्मृति चिरप्रेरक राहील. त्यांच्या हयातीत आणि आता सुध्दा टिळकापेक्षा अधिक व्यापक किंवा सखोल शास्त्रज्ञान कोणाचेही सापडणे कठीण. त्यांच्या गीतेवरील अधिकारी टीकेपेक्षा जास्त चांगला ग्रंथ अद्याप झाला नाही व लवकर होणारही नाही. (गीतरहस्य पृष्ठ ६) 11 (३) ज.स. तथा तात्यासाहेब करंदीकर 21 - 'गीता कर्मयोगपर आहे, हा शोध काही लो. टिळकांनी नवीनच लावला असे नाही. प्राचीन टीकाकारात वृत्तिकार आनंदवर्धिनी टीकाकार यानी ज्ञान - कर्म - समुच्चय पक्ष जोराने प्रतिपादिला आहे व कर्मयोगाचे समर्थन केले आहे. ज्ञानेश्वरानीही आपल्या ज्ञानेश्वरीत जेथे जेथे अवसर सापडला तेथे तेथे कर्मयोगाचे गीता रहस्य : एक अध्ययन