Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असा भेदभाव करीत नाही. आता अर्जुनाशिवाय तेथे दुसरा कोण श्रोता उपस्थित होता की ज्याला भगवंतांनी संन्यास मार्गाचा उपदेश केला आहे ? असा मार्मिक प्रश्न ज.स. तथा तात्यासाहेब करंदीकरांनी विचारला आहे. - (१०) लोकमान्यांचे गीतेवरील भाष्य हे अभिनव व आधुनिक आहे. शंकर रामानुजादिकांच्या संस्कृत टीका, ज्ञानदेव - वामन पंडितांची मराठी टीका यांच्या बरोबर लोकमान्यांच्या भाष्याची तुलना केल्यावर ही गोष्ट लक्षात येईल. पूर्वीच्या . लोकांनी आपले विचार श्लोकावरील टीकेत व्यक्त केले आहेत. आपल्या मताचे समर्थन व परमताचे खंडन हि तेथेच केले आहे. पण लोकमान्यांनी या प्रकारचा अवलंब केलेला नाही. त्यांनी गीता व प्रमुख उपनिषदे यांच्यातील सर्व महत्वाच्या विचारांची दखल घेऊन त्यांची सूक्ष्म चिकित्सा केली आहे. ही मांडणी करताना त्यानी वेद, उपनिषदे, मन्वादि स्मृती, मराठी संतकवींची वचने व अभिजात संस्कृत वाड़मयातील अवतरणे मुबलकपणे उद्धृत केली आहे. तसेच कांट, ग्रीन, शौपेन हौएर यांचे विचार तुलनेसाठी मांडलेले आहेत. त्यामुळे ग्रंथ अत्यंत विद्वत्ताप्र आहे. (११) ग्रंथ विद्वत्ता -प्रचुर असला तरी तो सर्वाना समजेल अशा सुबोध भाषेत लिहिला आहे. याचे कारण लोकमान्य हाडाचे पत्रकार आहेत. आबालवृध्दांना समजेल अशा भाषेत वृत्तपत्रातील अग्रलेख लिहिण्याची त्यांना सवय होती. आपला मुद्दा गळी उतरेपर्यंत सांगत रहाणे ही त्यंची पद्धत होती. श्लोकावरील टीपा देखील त्यांनी सुबोश पणे लिहिल्या आहेत. श्लोकात आलेल्या विचारांचे विस्तृत विवरण गीता रहस्याच्या कोणत्या प्रकरणात आहे याचे दिग्दर्शन केले आहे. एवढी एकसूत्रता कोणत्याही ग्रंथात सापडेल असे वाटत नाही. 203120450566 गीता रहस्य : एक अध्ययन ·