(५) लोकमान्यानी ज्ञान आणि कर्म यांच्या समुच्चयाने मोक्ष प्राप्त होतो असे स्पष्ट म्हटले आहे. शंकराचार्याच्या पूर्वीचे टीकाकार भर्तृप्रपंच यानी हेच मत मांडले आहे. या मतावर आचार्यांनी आपल्या गीता भाष्यात अवसर मिळेल तेथे टीका केली आहे. (६) मुख्य म्हणजे आचार्यांनी सर्व कर्मांचा त्याग करण्यास सांगितले आहे. संन्यास मार्गावर भर दिला आहे. 'ज्यावेळी मनात विरक्ती उत्पन्न होईल त्यावेळी संन्यास घ्यावा असे त्यांचे मत आहे. पण गीतेने कर्माचा त्याग करण्यास कोठेही सांगितले नाही. निष्काम कर्माचरण, कर्मफल त्याग व कर्मे ईश्वरास अर्पण करणे या गोष्टी सांगितल्या आहेत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास (Geeta tells renunciation in kama & not of Karma) आनंदवर्धनाने आपल्या गीतेवरील टीकेत कर्मयोगाचे प्रतिपादन केले आहे, असे तात्यासाहेब करंदीकरानी म्हटले आहे.
- 1
(७) अर्जुनास युध्दास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या गीतेत मोक्ष मार्गाचे इतके विस्तृत विवेचन कशासाठी आले आहे. ही त्यांची मूलभूत शंका आहे. ते गीतेला प्रवृत्तिमार्गी मानतात. गीतेकडे आदर्श नीतिशास्त्र म्हणून पहातात माणसाने व्यवहारात कसे वागावे, याचे गीतेत मार्गदर्शन आहे. हा ग्रंथ सोवळ्यात बसून वाचायचा नसून दैनंदिन व्यवहारात मार्गदर्शन करणारा आहे, असे त्यांचे मत आहे. अर्थात, गीतेत निवृत्तिमार्गाचे तसेच संन्यासमार्गाचे हि विवेचन आहे, ही गोष्ट त्यांना मान्य आहे. (८) तसेच प्रस्तावनेच्या अखेरीस ते सांगतात निव्वळ स्वार्थ परायण बुध्दीने संसार करुन थकल्या भागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनही गीता सांगितली नसून संसारच मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्य मात्राचे खरे कर्तव्य काय ? याचा तात्विक दृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीलशास्त्राची प्रवृत्ती झाली आहे" (प्रस्ता. पृष्ठ १० ) (९) अर्जुन अज्ञानी होता म्हणून त्यास कर्मयोग सांगितला आहे' अशी एक कोटी संन्यास मार्गीयाकडून लढविण्यास येते. गीता हे शास्त्र आहे, हे मान्य केल्यावर ते सर्वास सारखाच उपदेश करते. शिक्षक वर्गात शिकवताना हुशार मुले व मठ्ठ मुले गीता रहस्य : एक अध्ययन - 11