Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९) उपसंहार अखेरीस 'गीतारहस्या' विषयी चार शब्द सांगून ग्रंथाची समाप्ती करतो. 'गीतारहस्य' प्रकाशित झाल्यास आता शंभर वर्षे उलटली आहेत. या एक विसाव्या शतकात माझ्या सारखा जिज्ञासू अभ्यासक या ग्रंथाचे परिशीलन करतो. तेव्हा काही गोष्टी जाणवल्या खेरीज रहात नाहीत. (१) एकतर हा ग्रंथ अत्यंत विस्तृत मोठा आहे. पूर्वार्धातील पाचशे पंचावन्न पृष्ठांचा प्रबंध हा थक्क करुन सोडणारा आहे. लोकमान्यांची विचारसरणी सरळ, ठाम व सुस्पष्ट आहे. लेखन पध्दती अत्यंत प्रभावी आहे. ती पाश्चात्याच्या लेखन पध्दती वर आधारलेली आहे. केवळ सातशे श्लोक असलेल्या लहानशा ग्रंथावरील आठशे पानांचे भाष्य अप्रतिम आहे. ग्रंथातील भाषा अगदी सुबोध आहे. (२) विषयाचा पसारा मोठा आहे तथापि गीतेचे प्रमुख उद्दिष्ट कर्मयोगाचे प्रतिपादन करणे हेच आहे. हा मुद्दा अनेकदा उगाळलेला असल्यामुळे विचारांची पुनरुक्ति झाली आहे. त्यामुळे या सान्या प्रतिपादनास समर्थनाची छटा प्राप्त झाली. दुसऱ्या शब्दास सांगायचे झाल्यास त्यानी कर्मयोगाची वकिली केली आहे. पण ही वकिली अत्यंत निर्मल अंतःकरणाने व निःपक्षपातीपणे केलेली आहे. (३) सांख्य आणि योग या दोन स्वतंत्र निष्ठा आहेत. कोणत्याही मार्गाचे अनुसरण केले तरी मिळणारे फल एकच आहे. संन्यास योग व कर्मयोग या दोहोत कर्मयोग वरचढ आहे, असे खुद्द गीतेतच सांगितले आहे. त्यामुळे लोकमान्यांचे प्रतिपादन साधार आहे. कर्मयोग का सरस आहे, याचे उत्तर गीतेनेच दिले आहे. यामुळे यज्ञचक्र चालू रहाते व लोकसंग्रह करता येतो. (४) आचार्य भक्त विष्णुशास्त्री बापट व त्यांचे भाचे अद्वैतालंकार द. वा. जोग यानी लोकमान्यांच्या प्रतिपादनावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यानी प्रथम शंकराचार्यांचा पक्ष व्यवस्थित मांउला आहे. त्यांचा मुख्य आक्षेप असास की सांख्ययोग व कर्मयोग या दोन स्वतंत्र निष्ठा नाहीत. कर्मयोगाने चित्तशुध्दी झाल्यावर सांख्ययोगाने मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच कर्मयोग हा ज्ञानयोगाची पायरी आहे. गीता रहस्य : एक अध्ययन