‘ज्ञानभक्तियुक्त’ कर्मयोग हेच गीतेचे खरे तात्पर्य आहे, असे सिध्द होते (पृष्ठ ४३५) मन्यादि स्मृतीत नुसती कर्मे करण्यास सांगितले आहे पण ती का करावीत, हे सांगितलेले नाही गीतेत त्या कर्मांची मूलतत्वे सांगितली आहेत, यालाच कर्मयोग असे नाव आहे. महाभारतात सूक्ष्म धर्माधर्माचे विवेचन करुन धर्मांच्या मूलतत्वांचा गीतेत ऊहापोह केला आहे. पाश्चात्यानी नीतिशास्त्राची मूलतत्वे सांगितली आहेत भारतीय तत्वज्ञानात त्यांचा कोठे ऊहापोह केलेला दिसत नाही त्यामुळे भारतीय विचारसरणीत नीतिशास्त्रास काही स्थान नाही अशी समजूत होते. पण ही समजूत चुकीची आहे. गीतेतील आध्यात्मिक मूलतत्वांशी पाश्चात्यांच्या नीतिशास्त्राशी तुलना केली असता प्रश्नाचा निकाल लागेल. एखाद्या कर्माचा बरा - वाईट परिणाम झाला असता कर्मे करणाऱ्याची बुध्दी कशी आहे, हे पाहिले जाते. एखाद्या कर्माचा फायदा चार पाच लोकाना झाला की शेकडो लोकाना झाला याकडे न पहाता कर्त्याची बुध्दी किती शुध्द आहे, हे विचारात घेतले जाते. ज्याचे मन व बुध्दी शुध्द झालेली आहे त्यच्या हातून एखादे पापकर्म घडलेतरी त्याला त्यचा दोष लागत नाही. आता शुध्द बुध्दी म्हणजे काय हे पाहिले पाहिजे. मागे तिसया अध्यायात 'इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुध्दी आहे व बुध्दीच्याहि पलीकडे आत्मा आहे' (अ. ३. श्लोक ४२) आत्मा सर्व प्राणिमात्रात एकच आहे, हे जाणून कर्माकर्माचा निर्णय करणारी बुध्दी ही शुध्द होय. हिलाच सात्विक बुध्दी व साम्यबुध्दी अशी दुसरी नावे आहेत. मनुष्याच्या बाह्य आचरणावरुन त्याची बुध्दी शुध्द आहे की नाही, हे ओळखता येते. यामुळेच 'कर्मापेक्षा बुध्दी श्रेष्ठ आ (अ. २. श्लोक ४९) असे म्हटले आहे. मनुष्याने व्यवहारात वागत असता 'मी तसाच दुसरा आहे' हा विचार सतत मनात बाळगला पाहिजे. म्हणजे त्याच्या हातून कोणावर अन्याय होणार नाही, याला 'आरनौपम्य बुध्दी' असे नाव आहे. हा सत्वशील अंत करणाचा धर्म आहे. पाश्चात्य तत्वज्ञानी कांट, ग्रीन किंवा पॉल डायसन यानी जरी अशाचा प्रकारचे विचार मांडले असले तरी वेदांत शास्त्रांचे सिध्दांत त्यांच्याही पुढे गेले आहेत, असे लोकमान्यानी स्पष्ट म्हटले आहे (पृष्ठ ४४६) त्यामुळे पाश्चात्यानी मांडलेले नीतिशास्त्र हे वेदांत गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१२४
Appearance