सांख्यांच्या प्रकृति पुरुष विचाराशी सांगड घातली आहे. चौदाव्या अध्यायात परमेश्वर सर्वत्र असताना सत्व, रज व तम या तीन गुणांच्या योगे जगात वैचित्र्य कसे उत्पन्न होते, हे सांख्य विचारानुसार सांगितले आहे. अखेरीस त्रिगुणातीत पुरुषाची स्थिती सांगितली आहे. तिचे स्थितप्रज्ञाशी साम्य आढळून येते. पंधराव्या अध्यायात ब्रहमांडाचे वृक्षरुपाने वर्णन केले आहे. परमेश्वर हा क्षर आणि अक्षर या दोहोच्या पलीकडे असून त्यास' पुरुषोत्तम' असे नाव आहे. त्याची भक्ति केल्याने मनुष्य कृत कृत्य होतो. सोळाव्या अध्यायात दैवासुर संपत्तीचे वर्णन आहे. चांगल्या वाईट गुणामुळे माणसांच्या वर्तनात फरक पडतो त्यामुळे त्याना भिन्न गती प्राप्त होते. दैवी संपत्तीच्या माणसास सद्गती प्राप्त होते तर आसुरी संपत्तीचे लोक उत्तरोत्तर अधोगतीस प्राप्त होतात. सतराव्या अध्यायात प्रकृति त्रिगुणात्मक असल्यामुळे श्रध्दा, दान, यज्ञ, तप यांचेही सात्विक, राजस व तामस असे प्रकार होतात, असे सांगितले आहे. त्यानंतर 'ओम्- तत्सत' या मंत्रातील ॐ तत् व सत या शब्दांचा अर्थ स्पष्ट केला आहे. तत् या पदाचा अर्थ निष्काम बुध्दीने केलेले कर्म असा होतो. तर सत या पदाचा अर्थ चांगले पण काम्य बुध्दीने केलेले कर्म असा होतो. अठराव्या अध्यायाच्या आरंभी अर्जुन प्रश्न विचारतो की 'मला संन्यास्तचे व त्यागाचे तत्व समजून घ्यावयाचे आहे' याच्या उत्तरात भगवान सांगतात की कर्मयोग 'हा तत्वतः संन्यासच आहे. संन्यास म्हणजे सोडणे असा अर्थ आहे. संन्यासमार्गात कर्मे सोडण्यात येतात तर कर्मयोगात फलाशा सोडली जाते. यज्ञादि श्रौत कर्मे चित्तशुध्दि कारक आहेत त्यामुळे ती निष्कामबुध्दीने करावीत त्यायोगे यज्ञ चक्र लोकसंग्रह ही साधली जातात. यानंतर पुन्हा ज्ञान, कर्म, कर्ता बुध्दी, घृति व सुख यांचेही प्रकृतिच्या योगे सात्विक, राजस व तामस असे प्रत्येकी तीन प्रकार होतात. परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याला शरण गेल्यास तो आपली सर्व पापापासून सुटका करतो. १५) उपसंहार - या प्रकरणाच्या सुरवातीस लोकमान्य लिहितात ‘‘उपनिषदातील अद्वैत वेदांताची भक्त भक्तीशी जोड घालून तद्वारा थोर व कर्त्या पुरुषांच्या आयुष्यक्रमाची उपपत्ति लावणे, किंवा थोडक्यात सांगावयाचे असल्यास गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१२३
Appearance