खरा किंवा नित्य असा या श्लोकाचा भावार्थ आहे." (पृष्ठ ६७६ ) प्रतीके ही एखाद्या पांगुळगाड्याप्रमाणे मन एकाग्र करण्याची साधने आहेत, हे लक्षात घेतल्यावर प्रतीकाच्या श्रेष्ट कनिष्टपणाचा तंटा करणे हे व्यर्थ आहे, हे समजून येईल. भक्तिमार्गात भवसागर तरुन जाण्याची जी शक्ती आहे, ती प्रतीकामुळे आलेली नाही. तर ती भक्तिभावाने आलेली असते. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर मनात काही हेतू बाळगून लोक निरनिराळ्या देवतांची उपासना करतात. त्यांना त्याचे फळ मिळतेही पण ते फळ ती विशिष्ट देवता देत नाही तर ईश्वर देतो, हे लक्षात ठेवले नाहिजे. वेदांतसूत्रातही असाच निर्णय केला आहे . (वे. सू. ३–२-३८ - ४१ ) दुसरे असे की प्रतीकात देव नाही' हे भक्तिमार्गातील लोकांना चांगले ठाऊक आहे. जेव्हा आपण पूजा करावयास बसतो तेव्हा समोरच्या प्रतीकात अथवा मूर्तीत देव आहे अशी कल्पना करतो. त्यालाच प्राणप्रतिष्ठा करणे, असे म्हणतात. आणि कोणत्याही देवतेची अथवा प्रतीकाची उपासना केली तरी परमेश्वराला पोहोचते, असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. (गीता ९.२२ ) परमेश्वराची कल्पना करुन प्रतीकाच्या ठिकाणी भाव ठेवा, असे म्हटल्याने भागत नाही. भावना ठेवणे हा मनाचा अथवा श्रध्देचा धर्म आहे. त्या विश्वासाला बुध्दीची जोड नसेल तर ती आंधळी होते. हे सांगायला लको. श्रध्दा कशावर ठेवावी व कशावर ठेवू नये, हे सांगण्याचे काम बुध्दीचे आहे. पण बुध्दी शुद्ध, निर्मल असल्याशिवाय ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही. बुध्दी किंवा मन हे एकदम निर्मल होत नाही, त्या साठी प्रयत्न करावे लागतात त्यासाठी गीतेने क्रम सांगितला आहे. "माझ्या ठिकाणी चित्त स्थिर कर, हे तुला जमत नसेल तर वारंवार प्रयत्न कर. प्रयत्नहि जमत नसेल तर चित्तशुध्दी करणारी कर्मे कर आणि हे ही जमत नसेल तर कर्मफलाचा त्याग कर. व मला प्राप्त करुन घे." (गीता.१२.९ ते ११) सारांश, या गोष्टी लवकर साध्य होणाऱ्या नाहीत. त्या साठी श्रध्दापूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. हे काम जन्मी झाले नाही तर पुढील जन्मात होईल, असे भगवंतांनी आश्वासन दिले आहे आणि या अर्थानेच गीतेमध्ये SSEMAN गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/११७
Appearance