4 'महाभारतातील व्याधाने ब्राहमणास उपदेश केल्यानंतर 'माझा 'प्रत्यक्ष धर्म' पहा असे सांगून आपल्या वृध्द मातापित्याकडे नेले. तर पुंडलिकाने माता-पित्याची सेवा करीत असता प्रत्यक्ष विठोबास थोडा वेळ उभे राहू दिले, या गोष्टी हेच तत्व सांगतात. भक्ती ही उपासना उपनिषदात सांगितलेल्या सर्व विद्यामध्ये उत्तम आहे. यास्तव तिला 'राजविद्या' असे म्हटले आहे. या विद्येचा उपदेश पात्र व्यक्तीलाच केला जात असल्याने तिला 'गूढ विद्या' असे नाव दिलेले आहे. या मार्गाचे वर्णन गीतेने पुढील श्लोकात केले गआहे. 'राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ (गीता ९.२) - अर्थ – हा मार्ग सर्व विद्यामध्ये व गुह्यामध्ये श्रेष्ट आहे. तो उत्तम, पवित्र, प्रत्यक्ष दिसणारा, धर्मानुकूल व सुखाने आचरण करण्यासारखा व अविनाशी आहे. या श्लोकातील प्रत्येक शब्दाची लोकमान्यानी फोड केली आहे. 22 यानंतर भक्तिमार्गातील धोक्याकडे त्यानी लक्ष वेधले आहे. भक्तिमार्गात प्रतीकास फार महत्व आहे. त्याच्या साहाय्याने चित्त एकाग्र करणे सोपे जाते. गीतेने सृष्टीतील उत्तम गोष्टीत परमेश्वर वास करतो असे सांगून ठळक प्रतीकेच सांगितली आहेत. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचाच तो मार्ग आहे. असे असले तरी 'सर्वव्यापी परमेश्वर प्रतीकात असत नाही (वे.सू.४.१.१४) असे वेदांतमतात स्पष्ट सांगितले आहे. मग 'तुझे प्रतीक चांगले की माझे प्रतीक चांगले ?' असा तंटा करण्यात काय अर्थ आहे ? पण असा तंटा, वाद, रणे माजलेली आहेत. या बाबतीत गीतेने दिलेला इशारा मोलाचा आहे.
- 1
अव्यक्तं व्यक्तिमापनं मन्यन्ते बुद्धयः । परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम ।।" (गीता ७.२४) - अर्थ - मी अव्यक्त असता मूर्ख लोक मला व्यक्त म्हणजे अव्यक्त स्वरुप सोडून व्यक्त रुप धारण करण्याची युक्ती (गीता ४–६,७.१५,९.७ पहा) हीलाच वेदांती माया असे म्हणतात व या योग मायेने परमेश्वर आच्छादिला म्हणजे तो व्यक्तरुपधारी होतो. सारांश, व्यक्त सृष्टी मायिक किंवा अनित्य व अव्यक्त परमेश्वर गीता रहस्य : एक अध्ययन