श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्म निवेदनम || ' (भाग. ७-५-२३) अर्थ – विष्णूच्या कथा ऐकणे, गुणगान करणे, स्मरण करणे, चरणसेवा करणे, पूजा करणे, नमस्कार करणे, आपण त्याचा दास आहोत असे मानणे, मित्र मानणे व आपले मनोगत त्यापुढे व्यक्त करणे. 11 भागवतातील नऊ प्रकारच्या भक्तीचे नारदाच्या भक्तिसूत्रात अकरा प्रकार सांगितले आहेत (नारद सू.८२) ईश्वरास अनन्य भावाने शरण जाणे व त्याच्यावर निरतिशय प्रेम करणे, हे भक्तीच्या साया प्रकारातील समान सूत्र आहे. उपासनेचे सगुण आणि निर्गुण अथवा व्यक्त आणि अव्यक्त असे दोन प्रकार आहेत. अव्यक्ताच्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता होऊ शकत नसल्याने तो मार्ग कष्ट दायक आहे (गीता.१२.५) असे सांगून गीतेने आपले मत व्यक्त उपासनेच्या पारड्यात टाकले आहे. परब्रह्माची प्राप्ती करुन घेण्याचे हे दोन मार्ग आहेत. यानाच अनुक्रमे ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग अशी नावे आहेत. प्रस्तुत प्रकरणात लोकमान्यांनी भक्तिमार्गाचे स्वरूप व महत्व स्पष्ट केले आहे. ज्ञान आणि भक्ती या दोन गोष्टी जरी सारख्याच योग्यतेच्या असल्या तरी गीतेने भक्ती ही निष्ठा मानलेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा भक्ती ज्ञानप्राप्तीचे साधन आहे, साध्य नाही. मात्र भक्ताची आपल्या ईश्वरावर अनन्य साधारण निष्ठा असते. तो ईश्वराला माऊली मानतो. तिच्या चरणी लीन होतो. तिच्या चिंतनात रंगून जातो. माझी गति, माझा पोषणकर्ता, माझा धनी, माझा साक्षी, माझ्या निवाऱ्याचे पद, आरामाचे घर माझा अखेरचा आधार व विसावा, माझा सखा व कैवारी म्हणून लेकराप्रमाणे मी ज्याचे प्रेमाने व लडिवाळपणाने आकलन करू शकेल, असा त्याचा भाव असतो. सत्यसंकल्प, सकलैश्वर्यसंपन्न, दयासागर, भक्तवत्सल, परमपवित्र, परमोदार, परमकारुणिक, परमपुज्य, सर्वसुंदर, सकलगुणनिधान, किंवा थोडक्यात सांगणे असल्यास जिव्हाळ्याचा सगुण, प्रेम गम्य व व्यक्त म्हणजे प्रत्यक्ष रुपधारी सुलभ परमेश्वरच मनुष्य भक्तीसाठी स्वभावत स्वीकारीत असतो, असे कोणताही धर्म पाहिला तरी आढळून येते" (पृष्ठ ३८४-८५) गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/११५
Appearance