समजत नसले किंवा विद्वानात त्या बद्दल मतळेद असले तरी श्रद्धेच्या योगे ते समजू शकते. आपल्या श्रद्धेच्या बळावर सामान्य पुरुष त्याचे स्वरुप ओळखून त्याची उपासना करतो. श्रुतीवचनावर टीका, भाष्ये लिहिली जाण्यापूर्वी देखील सामान्य लोक गूढ तत्वाची या ना त्या स्वरुपात आराधना करीत होते. - paded ईश्वराचे भजन - पूजन करण्यास सांगणाच्या मार्गास 'भक्तिमार्ग' असे नाव आहे. भक्तीचे लक्षण ‘सा परानुरक्तीश्वरे'। (शांडिल्य सूत्र - २) असे दिले आहे. ईश्वराविषयीच्या निरतिशय प्रेमाला भक्ती असे नाव आहे. अंचित्य ब्रह्म हे ईश्वर स्वरूप मानून प्रेमाने त्याची आळवणी करणे म्हणजे भक्ती होय. अर्थात, पुष्कळदा ही भक्ती सकाम असते. देवाकडून आपल्याला काहीतरी मिळावे, या हेतूने केलेल्या भक्तीस सकाम भक्ती म्हणतात. व ती कमी प्रतीची मानलेली आहे. गीतेने भक्तांचे चार प्रकार सांगितले आहे. “चतुविधां भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । - आर्तो जिज्ञासुरर्था र्थी ज्ञानी च भरतर्षम ।। " (गीता ७.१६ ) अर्थ - हे भरतश्रेष्ठ अर्जुना, आर्त म्हणजे पीडित, ज्ञानप्राप्तीस उत्सुक काही हेतू मनात बाळगणारे आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त भक्त माझी भक्ती करतात. यातील सकाम भक्तीस अर्थार्थी द्रव्यादिकांची अपेक्षा करणारी भक्ती म्हणले आहे. गीतेने ही भक्तो राजस मानली आहे. ज्ञानी हा श्रेष्ठ भक्त मानलेला आहे. (गीता ६७.१७) आता निर्गुण निराकार ब्रह्म हे सामान्य माणसाच्या उपासनेचा विषय होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या सगुण रुपाची कल्पना करण्यात आली आहे. तो दयाळू, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्याप्ती व मानवशरीर धारी आहे, असे समजण्यात येऊ लागले. वल्लभाचार्यानी परब्रहमास 'कृष्णरुप' मानले आहे. त्याप्रमाणे त्याला राम, कृष्ण, शिव, विठोबा अशी नावे देण्यात आली व त्यांच्या प्रतिमा, अथवा मूर्ती तयार केल्या गेल्या . देवळात अथवा घरात बाळकृष्णासमोर अथवा शिवलिंगासमोर बसून त्याची पूजा अर्चा करण्यात येऊ लागली. त्यात हळद, कुंकू, अक्षता, पाने, फुले, धूप, दीप, नैवेद्य, आरती असे सोपस्कार करण्यात येऊ लागले व भक्तिमार्गाने आपले बस्तान बसवले. भागवतात भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत. गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/११४
Appearance