युधिष्ठिर हा तर ‘शठं प्रति सत्यम' या नीतीने वागणारा आहे. तर आता या साऱ्याचा मेळ कसा घालायचा हा प्रश्न पडतो. गीतेत याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे. दुष्टांचे निर्दालन करणे हे ईश्वरी कार्य मानून अर्जुनास युध्द करण्यास सांगितले आहे. मनूने ‘शत्रूशी भलेपणाने वागणे, हा यतिधर्म आहे, असे म्हटले आहे. दुसरा जर आपणाशी वाईट वागत असेल तर आपण एकट्याने त्याच्याशी भलेपणाने वागून निभाव लागणार नाही, हे ओळखायला हवे. या विचारातूनच 'शठं प्रति शाठ्यम' हा विचार जन्माला आलेला आहे. फौजदारी कायद्यातहि आत्मसंरक्षणाची तरतूद आहे. 'आघाता इतकाच प्रत्याघात ' हा निसर्गाचा नियम आहे. मराठीत यास 'जशास तसे' असे म्हणतात. याच कारणास्तव समत्वबुध्दीने युध्द करण्याचा उपदेश गीतेत सांगितला आहे. मात्र यात आपण दुसऱ्यावर हल्ला करावयाचा नाही. दुसऱ्याने आपल्यावर हल्ला केल्यावर प्रतीकार करावयाचा, हे कर्म योगाचे सूत्र आहे. त्यामुळे (Offence is the best defence) हा विचार कर्मयोगास मान्य नाही. भारवीच्या 'किरातार्जुनीय' या महाकाव्याचा दुसऱ्या व तिसऱ्या सर्गात द्रौपदी व भीम आणि युधिष्ठिर यांचा याच विषयावर वादविवाद झालेला दर्शविला आहे. या ठिकाणी टिळकांनी एक महत्वाचा इशारा दिला आहे. "पण य ठिकाणी दुसरे असे ही लक्षात ठेवले पाहिजग की, दुष्ट पुरुषाचा प्रतिकार साधुपणाने होणे शक्य असेल तर प्रथम तो साधुपणानेच करावा कारण दुसरा मनुष्य दुष्ट झाला म्हणजे तेवढ्यामुळेच आपण हि त्याबरोबर दुष्ट झाले पाहिजे. किंवा एकजण नकटा झाला म्हणून इतरांनीही त्यासाठी आपली नाके कापून घ्यावीत असे होत नाही." (पृष्ठ ३६७) यास पुढे त्यानी मार्मिक उदाहरण दिले आहे काटा पोटिसानी बाहेर आला नाही तर मग काट्याने काटा काढावा. आता हा कर्माच्या कर्तव्याचा विचार इतका सूक्ष्म आहे की अशा प्रसंगी कोणता निर्णय घ्यावा, हे भल्याभल्यानाही समजत नाही. पंडित या प्रसंगी शुष्क काथ्याकूट करीत बसतात. अशावेळी पांडित्यावर अथवा सारासार विवेकबुध्दीवर अवलंबून न रहाता शुध्दबुध्दीच्या साधु पुरुषाला शरण जाणे शहाणपणाचे ठरते. गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१११
Appearance