आता परोपकाराचे उदाहरण घेतले तर हा मुद्दा चांगला स्पष्ट होईल. एखादा माणूस अडचणीत सापडला असता सज्जन माणूस त्याला मदत करतो, अडचण दूर करतो. सज्जनच काय एखादा अडाणी माणूसही दुसऱ्याला मदत करण्यास धावतो. याचे कारण काय? अशी मदत करण्यात त्याचा कोणताही हेतू नसतो. त्याची बुध्दी निर्मल असतेच असे ही नाही. हा परोपकार करण्याने त्याला समाधान वाटते. इतके आपण म्हणू शकतो. आणि अध्यात्म शास्त्रातही हेच तत्व निराळ्या शब्दात सांगितले आहेमी स्वतःशी जसा वागतो तसेच मी इतराशी वर्तन केले पाहिजे" या विचारास आत्मौपम्य बुध्दी असे नाव आहे. कोणत्याही सत्कृत्याचे हेच बीज आहे. महाभारतात आत्मौपम्य बुध्दीचे विशेष स्पष्टीकरण दिले आहे. शांतिपर्वात युधिष्ठिरास धर्मलक्षण सांगताना भीष्म म्हणतात. " आपल्या बरोबर दुसऱ्याने ज्याप्रमाणे वागू नये असे आपण इच्छितो त्याप्रमाणे आपणहि लोकाबरोबर वागू नये. स्वतः जिवंत रहावे अशी जो इच्छा करतो तो दुसऱ्यास कसा मारणार ? जे जे आपल्याला हवे ते ते परक्यासहि हवे " (महा. शान्ति. २५८.१९.२१) गौतम बुध्दास जरी आत्म्याचे अस्तित्व मान्य नव्हते तरी भिक्षूनी दुसऱ्या भिक्षूशी कसे वागावे हे सांगताना आत्मौपम्य बुध्दीचा निर्देश केला आहे. "1 - टिळक लिहितात : उपनिषदात, मनुस्मृतीत, गीतेत महाभारताच्या इतर प्रकरणात व बौध्द धर्मातच नव्हे तर इतर देशात व धर्मातहि आत्मौपम्याच्या या सोप्या नीतितत्वासच सर्वत्र अग्रस्थान दिलेले आहे, असे आढळून येईल, यहुदी आणि ख्रिस्ती धर्मपुस्तकात "तू आपल्या शेजाऱ्यावर आपल्या प्रमाणेच प्रीती कर (लेव्हि १९.१५ मॅथ्यू २२.३९) अशी जी आज्ञा आहे ती या नियमाचेच रुपांतर आहे.' (पृष्ठ ३६०) आत्मौपम्य बुध्दीत अथवा 'वसुधैव कुटुंबकम' या विचारसरणीवर आक्षेप घेण्यात येतो. यामुळे देशाभिमान, स्वाभिमान याना काही अर्थ राहात नाही. दुसरा जर आपल्याला मारायला आला तर प्रतीकार करावयाचा की नाही. ख्रिस्ती धर्मात "कोणी तुझ्या एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे कर" (मॅथ्यू ५.३९ ) असे म्हटले आहे. एकनाथानी या प्रमाणे आचरण केल्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. " गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/११०
Appearance