Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणसाला कर्मे सुटत नाहीत. ज्ञान झाले तरी वासना सुटतातच असे नाही. वासना या वाईट नसून त्या मागील आसक्ती ही बंधनास कारणीभूत असते. तसेच आसक्ती सुटली तरी कर्मे सुटत नाहीत. 'कर्म ज्या अर्थी अपरिहार्यच आहे त्या अर्थी ज्ञानी पुरुषाने ज्ञानोत्तर ही ते केलेच पाहिजे. पण ज्या अर्थी त्याच्या स्वतःचे म्हणून त्याला काही कर्तव्य नसते, त्या अर्थी आपली कर्मे आता निष्काम बुध्दीने करणे त्याला प्राप्त आहे'(पृष्ठ २९७) असे टिळकांनी म्हटले आहे. 'योगारुढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते' (गीता ६.३. उत्तरार्ध ) या ओळीचा अर्थ टिळकांनी स्पष्ट केला असून विरोधकांच्या मताचे खंडन केले आहे. तसेच श्लोकाच्या भाषांतरावरील टीपेत हि विस्तृत चर्चा केली आहे. या ओळीचा अर्थ टिळकांनी तोच पुरुष योगारुढ झाला म्हणजे त्यास (पुढे) शम हे (कर्माचे) कारण होते असा सांगितला आहे. 'शम किंवा शांति हे दुसऱ्या कशाचे तरी कारण आहे 'शमः कारणमुच्यते' - असे या श्लोकात म्हटले आहे तेव्हा अर्थातच शम हे कारण मानून त्याचे पुढे कार्य काय हे पाहिले पाहिजे, पूर्वापार संदर्भाचा विचार केला तर 'कर्म' हेच ते कार्य होय असे निष्पन्न होते आणि मग योगारुढाने चित्त शांत करुन त्या शांतीनेच म्हणजे शमानेच आपले पुढील सर्व व्यवहार करावेत असा या श्लोकाचा अर्थ होतो. टीकाकार म्हणतात त्याप्रमाणे 'योगारुढाने कर्मे सोडावी' असा अर्थ करिता येत नाही." (पृष्ठ ३००). ‘फलाशा सोडावी ‘ या वाक्याचा खुलासाहि त्यानी विस्ताराने केला आहे. 'मी केलेल्या कर्माचे फळ मला मिळालेच पाहिजे असा माणसाचा आग्रह असतो. त्यास 'कर्माच्या फलावर तुझा अधिकार नाही. (गीता २.४७) असे उत्तर दिले आहे. पण फळावर आपला अधिकार का नसतो ? हे पाहिले पाहिजे. कर्मसृष्टीचे ज्ञात व अज्ञात व्यापार आणि मनुष्याचा प्रयत्न यांचा संयोग झाल्यावर फल प्राप्त होते, नुसत्या प्रयत्नाने ते मिळत जाही, हे लक्षात घेतले नाहिजे. या व्यापारासच 'दैव' म्हटलेले आहे. फलाबद्दल उदासीन राहून केवळ कर्तव्य म्हणून शांतपणे कर्मे करीत रहाणे, हेच नीतिदृष्ट्या व मोक्षदृष्ट्या उत्तम तत्व आहे.' ज्ञात्यानेही ज्ञानोत्तर निष्काम कर्माचरण का करावे याचे कारण 'लोकसंग्रह' असे दिलेले आहे. 'लोकसंग्रह' ही संकल्पना गीता३.२० ते २६ या गीता रहस्य : एक अध्ययन