पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मयोगशास्त्र ६५ केलेले आहे. गीतेंतच नव्हे, तर महाभारतांत इतर ठिकाण कर्माकमीचे जं विवेचन आहे तेंहि याच म्हणजे पारलौकिक व अध्यात्म दृष्टीनें केलेले असून त्यांत कोणत्याहि कर्माचा चांगलेवाईटपणा दाखविण्यास ‘धर्म’ आणि ‘अधर्म’ या दोन शब्दांचाच प्रायः सर्वत्र उपयोग केलेला आहे. पण ‘धर्भ’ आणि त्याचा प्रतियोगी म्हणजे उलट *अधर्म'हे दोन्ही शब्द त्यांच्या व्यापक अर्थानें कधी कधीं भ्रम उत्पन्न करणारे असल्यामुळे, कर्मयोगशास्रांत त्यांचा मुख्यत्वेंकरून कोणत्या अर्थानें उपयोग करितात याबद्दल येथे थेोडीी अधिक मीमांसा करणे जरूर आहे. ‘धर्म’ या शब्दाचा नित्यव्यवहारांत कित्येकदां निव्वळ“पारलौकिक सुखाचा मार्ग” या अर्थीच उपयोग करण्यांत येत असतो. “तुझा धर्भकोणता?” असा जेव्हां आपण एखाद्यास प्रश्न करितों, तेव्हां केवळ पारलौकिक कल्याणार्थ तूं कोणत्या मार्गानें जातेोस-वैदिक, बौद्ध, जैन, ख्रिस्ती, महमदं का पारसी-असें त्यांस विचारण्याचा आपला हेतु असतो; आणि त्याचप्रमाणे त्याचे उतरहि ते दत असतो. तसेंच स्वर्गप्राप्तीस साधनीभूत यज्ञयागादिवैदिक विषयांची मीमांसा चालली असतां “अथाते धर्मजिज्ञासा” वगैरे सूत्रांतूनहि ‘धर्म’ शब्दाचा हाच अर्थ विवक्षित आहे. परंतु ‘धर्म’ शब्दाचा एवढाच संकुचित अथै नसून याशिवाय राजधर्म, प्रजाधर्म, देशधर्म, ज्ञातिधर्म, कुलधमै, मित्रधमे, वगैरेऐह्विक नीतिबैधनांसद्दि ‘धर्म’ हृा शब्द् लाविण्यांत येत असते. धर्म शब्दाचे हे दोन अर्थ पृथक् करून दाखवावयाचे असल्यास पारलौकिक धमास ‘मेक्षिधर्म' किंवा नुस्तें ‘मेक्षि’ असें विशिष्ट नांवदेऊन व्यावहारिक धर्मास किंवा नुस्त्या नीतीस ‘धर्म’ हा एकेरी शब्दच लावण्यांतथत असतो. उदाहरणार्थ, चतुर्विध पुरुषार्थाँची गणना करितांना 'धर्मअर्थकाममेक्ष' असें आपण म्हणत असतेंॉ. यांतील पहिला शब्द ‘धभे’ यांतच जर मोक्षाचा समावेश झाला तर ‘मोक्ष’ म्हणून शेवटीं निराळा पुरुषार्थ सांगण्याची जरूर नाहीं. अर्थात् ‘धर्म' पदानें या ठिकाणीं जगांतील किंवा संसारांतील शेंकडे नीतिधर्मच शास्रकारांस अभिप्रेत आहत असें म्हटले पाहिजे. यांसच अपिण कर्तव्यकर्म, नीति, नीतिधर्म किंवा सदाचरण असें हल्लीं म्हणतों. पण प्राचीन संस्कृत ग्रंथांतून नीति किंवा नीतिशास्र हे शब्द विशेषेकरून राजनीतिीसच उद्देशून येजिीत असल्यामुळे कर्तव्यकर्म किंवा सद्वर्तन याच्या सामान्य विवेचनास ‘नीतिप्रवचन' न म्हणतां ‘धर्मप्रवचन’ हें नांव पूर्वी देत असत. परंतु नीति व धर्म या दोन शब्दांमधील हा पारिभूषिक भेद सर्व संस्कृत ग्रंथांतून स्वीकारिला आहे असें नाहीं. म्हणून आम्हींहि नीति, कर्तव्य व नुस्ता धर्म हे शब्द या ग्रंथांत एकाच अर्थी योजिले आहेत; व मेक्षिाचा विचार जेथे कर्तव्य आहे त्या प्रकरणांत ‘अध्यात्म’ व ‘भक्तिमार्ग’ अशी स्वतंत्र नांवें दिलीं आहत. महाभारतांत ‘धर्म' हा शब्द अनेक ठिकाणीं आलला असून “एखाद्यास ए गी. र. ५