पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ गीतारहस्य अथवा कर्मयोग ज्यास्त शोध करूं लागला; व त्यामुळे मनुष्यास आतां आगगाडी, तारायंत्र यांसारख्या युक्त्या सुचून बाह्य सृष्टीवर त्याचा अधिक अंमल चालू लागला आहे. कॉटें यास आधिभैतिक मार्ग असें नांव देतो; आणि कोणत्याहि शास्राचे किंवा गोष्टीचे विवेचन करितांना हाच मागे इतरांपेक्षां अधिक फायदेशीर व श्रष्ठ होय असे त्यानें ठरविले आहे. केॉट याच्या मतें समाजशास्त्राचा किंवा कर्मयोगशास्त्राचा तात्विक विचार करण्यास हीच दृष्टि स्वीकारिली पाहिजे; आणि ती स्वीकारून इतिहासावलोकनपूर्वक सर्व व्यवहारशास्राचा या पंडितानें असा मथितार्थ काढिला आहे कीं, प्रत्येक मनुष्यानें सर्व मानव जातीवर प्रेम ठेवून सदैव सर्व लोकांच्या कल्याणासाठीं झटणे हाच त्याचा या जगांतील परम धर्म होय भिल्ल, स्पेन्सर वगैरे इंग्रज पंडित यंचे मताचे पुरस्कर्ते आहेतम्हटलें तरी चालेल. उलट पक्षीं कान्ट, हेगेल, शेपेनहौएर वगैरे जर्मन तत्त्वज्ञानी पुरुषांनीं ही आधिभौतिक पद्धत नीतिशास्राच्या विवेचनाला अपुरी ठरवून आमच्या वेदान्त्यांप्रमाणें अध्यात्मदृष्टयाच नीतीचे समर्थन कर ण्याचा मार्ग अलीकडे युरोपांत पुनः स्थापित केला आहे. त्याबद्दल ज्यास्त माहिती पुढे सांगण्यांत येईल एकच अर्थ विवक्षित असतां ‘चांगलें व वाईट’ याच अर्थी ‘कार्य व अकार्य,' ‘धम्र्य व अधम्र्य,’ इत्यादि निरनिराळे पर्यायशब्द उपयोगांत कां आले, याचे कारण विषयप्रतिपादनाचे प्रत्येकाचे मार्ग किंवा दृष्टि भिन्नभिन्न असतात हें होय. भीष्मद्रोणादिकांचा ज्यांत वध करावा लागणारतें युद्ध मैं करणें श्रेयस्कर आहे किंवा नाहीं, असा अर्जुनाचा प्रश्न होता (गा. २.७); आणि एखाद्या आधिभौतिक पंडितावरजर या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रसंग आला असता, तर भारती युद्धापासून अर्जुनाचे स्वतःचे दृश्य नफानुकसान किती व एकंदर समाजावर त्याचे काय परिणाम घडतील याचा सारसारविचार करून युद्ध करणें न्याय्य' किंवा ‘अन्याय्य'याचा त्यानें निकाल दिला असता; कारण, कोणत्याहि कर्माचे जगावर जे आधिभौतिक म्हणजे प्रत्यक्ष बाह्य परिणाम घडणार त्यांखेरीज सदर कर्माच्या बरेवाईटपणाचा निर्णय करण्यास दुसरें साधन अगर कसोटीच या आधिभौतिक पंडितांस संमत नसत्ये. परंतु असल्या उत्तरानें अर्जुनाचे समाधान होणे शक्य नव्हतें. त्याची दृष्टि याहून व्यापक होती. केवळ या जगांतच नव्हे, तर पारलौकिकदृष्टया आपल्या आत्म्यासहि ಧ್ಧಿ होईल कीं नाहीं याचा निकालत्यास पाहिजे होता. युद्धांत भीष्मद्रोणादि आपणास राज्यप्राप्ति होऊन ऐहिक सुख मिळेल का नाहीं, किंवा लोकांना आपला अंमल दुर्योधनाचे राज्यापेक्षां अधिक सुखकारक होईल का नाहीं, याबद्दल त्याला शंका नव्हती. अर्थात् मा करितों तें ‘धम्र्य’ का ‘अधम्र्य’ 'पुण्य’ का “पाप' हें त्यास पहावयाचे हेोतें; व गीतेंतील विवेचनहि त्याच दृष्टीनें