पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मयोगशास्त्र to विद्येपैकीं येोगशास्र म्हणजे कर्मयोगंशास्र” हा त्यांतील विषय होय, असा आतां उघड अर्थ होतो. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्मज्ञान; तें प्राप्त झाल्यावर ज्ञानी पुरुषास पुढे दोन निष्ठा किंवा मार्ग (गी. ३.३) खुले असतात. एक सांख्य अथवा संन्यास आणि दुसरा येोग किंवा कर्ममार्ग-म्हणजे कर्मे न सोडितां तीच अशा युक्ती नेहमीं करणें कीं त्यांची मोक्षप्राप्तांस कधींच अडचण पडू नये. या दोन मागॉपैकीं पहिल्यास ‘ज्ञाननिष्ठा' असेंहि दुसरें नांव असून त्याचे विवेचन उपनिषदांत अनेक ऋषींनी व इतर ग्रंथकारांनीहि केलेले आहे. परंतु ब्रह्मविद्यान्तर्गत कर्मयेोगाचे किंवा योगशास्राचे तात्त्विक उपपादन भगवद्गीतेखेरीज दुसरें कोटेंहि नाही. म्हणून ज्यांनी हा संकल्प प्रथम रचिला,-आणि तो गीतेच्या सर्व प्रतीत आढळून येत असल्यामुळे गीतेवर कोणतीच टीका होण्यापूर्वी राचलेला असला पाहिजे असें अनुमान हेोतें हें मागें सांगितलेंच आहे,-त्यांनी गीताशास्रांतील विषयाची अपूर्वता काय हें दाखविण्यासाठींच ‘‘ब्रह्मविद्यायां योगशास्ने” हीं पर्दे त्या सकल्पांत साधार व सहेतुक घातलेली आहत, फुकट अगर मनचींच नव्हेत, हें आतां व्यक्त होतें; व गीतेवर सांप्रदायिक टीका होण्यापूर्वी गीतेचें तात्पर्य काय समजत असत याचाहि त्यानें सहज निकाल होतो. सुदैव आमचे, की कर्मयोगाचे प्रतिपादन करण्याचे हें काम या येोगमार्गाचे प्रवर्तक आणि सर्व योगांचे साक्षात् ईश्वर (योगेश्वर=योग+ ईश्वर) जे श्रीकृष्ण भगवान त्यांनी स्वतः पत्करून अर्जुनास त्यांतीलरहस्याचा सर्व लोकांच्या हितासाठीं बोध केला.‘योग’ आणि ‘योगशास्र' या गीतेंतील शब्दांपेक्षां ‘कर्मयोग' व कर्मयोगशास्र' हे शब्द जरा लांबट आहत खरे; पण गीतेंतील प्रतिपाद्य विषयाबद्दल पुनः कोणताहिं संदेह राहूं नये म्हणून ‘कर्मयोगशास्र’ हें लांबट नांवच आम्हीं या ग्रंथास व प्रकरणास दिले आहे. एकच कर्म करण्याचे जे अनेक येोग, साधनें, किंवा मार्ग असतात त्यांपैकीं पराकाष्ठचा चांगला व शुद्ध मार्ग कोणता, तो नेहमीं आचरितां येईल कीं नाहीं, नसल्यास त्याला अपवाद कोणते व ते कां उत्पन्न होतात,जेो मार्ग आपण चांगला समजतों तो चांगला कां, किंवा ज्यास वाईट म्हणतों तो वाईट कां, आणि हा चांगलेवाईटपणा कोणों व कोणत्या धोरणानें ठरवावा, किंवा त्यांतील बीज काय, इत्यादि गेोष्टी ज्या शास्राचे आधारें निश्चित करितां येतात त्यास 'कर्मयोगशाख्ञ' किंवा गीतेंतल्या संक्षिप्त रूपाप्रमाणें 'योगशास्त्र’ असें म्हणतात. चांगला आणि वाईट हे शब्द सामान्य आहेत; व त्याच अर्थी कधीं शुभ आणि अशुभ, कधीं हितकर व आहितकर, कधीं श्रेयस्कर आणि अश्रेयस्कर, तर कधीं पाप व पुण्य, अगर धम्यै आणि अधम्र्य, या शब्दांचा उपयोग करीत असतात. कायै ब