पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० गीतारहस्य अथवा कर्मयेोग हें निर्विवाद सिद्ध होतें. वैदिकधर्मग्रंथांतच नव्हे, तरं पाली व संकृत बौद्धधर्मग्रंथांतहि येोग शध्दाचा याच अर्थी उपयोग केलेला आढळून येतो. उदाहरणार्थ, शके २०० च्या सुमारास लिहिलेल्या मिलिंदप्रश्न नामक पालीग्रंथांत ‘पुब्बयोगो’ (पूर्वयोग) असा शब्द आलेला असून त्याचा अर्थ ‘पुब्बकम्म' (पूर्वकर्म) असा तेथे दिला आहे (मि. प्र. १.४.); आणि शालिवाहन शकाच्या आरंभीं झालेल्या अश्वघोष कवीच्या ‘बुद्धचरित' नामक संस्कृत काव्याच्या पहिल्या सर्गाच्या पन्नासाव्या श्रुलोकांत ہخ* 6 & ساخته است . به همه अ{च यक य। गtवधा द्विजानामप्राप्तमन्यजनका जगाम । “ब्राह्मणांना योगविधि शिकविण्याचे कामों जनकराजा आचार्थ (उपदेष्टा) झाला, जनकापूर्वी असलं आचयित्व कोणास प्राप्त झाले नव्हतें,” असें वर्णन अहि. या ठिकार्णो योगविधि म्हणजे निष्कामकर्मयोगाचा विार्थ असाच अथे करावा लागतो. कारण, जनकीच्या वर्तनाचें हेंच रहस्य होय असें गतिादि ग्रंथ कंठरवानें सांगत असून, अश्वघेोषानें अ॥पल्या बुद्धचरितांत (९. १९. व २०) ‘गृहस्थाश्रमांत राहूनहि मोक्ष कसा संपादन करिता येतेो” हें दाखविण्यासाठीं जनकाचाच दाखला दिलेला आहे. जमकाने घालन दिलेल्या मागीला ‘याग'हें नांव होतें, एवढे याप्रमाणें बौद्धग्रंथावरूनहि सिद्ध झाल्यावर गीतेतल्या ‘योग'शब्दाचाहिं हाच अर्थ घ्यावा लागतेो; कारण जनकाचाच मार्ग गीतेंत प्रदिपाद्य आह. असें गीताच सांगत आह 蠶 ३. २०). सांख्य व योग या दोन मागोंबद्दल ज्यास्त विचार पुढे करण्यांत येईल. ‘योग' शब्दाचा उपयोग गतेिंत कोणत्या अर्थी केलेला आहे एवढाच प्रस्तुतचा प्रश्न आह. योग म्हणजे कर्मयोग आणि योगी म्हणजे कर्मयोगी, असा गीतेंतल्या शब्दांच्या मुख्य अर्थाचा याप्रमाणें एकदां निर्णय लागल्यावर भगवद्गीतेंत प्रातपाद्य विषय कोणता हें निराळे सांगावयास नका. भगवान् स्वत: आपल्या उपदशास“योग’ हें नांव देतात (गी.४.१-३),इतकंच नव्हे, तर सहाव्या अध्यायांत अर्जुन (गी. ६.३३) आणि गीतेच्या अखेरच्या उपसंहारांत (गी. १८. ७५) संजयहि गतेिंतील उपदेशास ‘योग’ हेंच नांव देतात, हें वर सांगितले आहे. तसेंच प्रत्येक गीताध्यायाच्या अखेर अध्यायसमाप्तदर्शक जो संकल्प असतो त्यांतहि ‘योगशास्र’ हाच गीतेंतील प्रतिपाद्य विषय होय, असें स्वच्छ म्हटलें आहे. पण या संकल्पांतील शब्दाच्या अथौकड प्रस्तुतच्या टीकाकारांपैकी कोणींच लक्ष दिलेलें दिसत नाहीं.“श्रीमद्भगबद्गीतासु उपनिषत्सु” हीं आरंभीचीं दोन पदें झाल्यावर पुढे या संकल्पांत “ब्रह्मविद्यायाँ योगशास्र” असे दोन शब्द येत असतात. पैकीं पहिल्या दोन पदांचा अर्थ“भगवंतांनी गाइलेल्या उपनिषदांत” असा असून, पुढीलदोन शब्दांनी “ब्रह्म