पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मयोगशास्त्र به با आहे. कारण, “पातंजल योगाचा आश्रय करून तूं युद्धाला उभा रहा” हें म्हणणेंच संभवनीय व शक्य नाही. “कर्मयोगेण योगिनाम्” (गी. ३. ३) म्हणजे येोगी पुरुष कर्म करणारे असतात असें यापूर्वीच स्पष्ट म्हटले असून, महाभारतांत नारायणाय किंवा भागवत धर्माच्या विवेचनांतहि या धर्मातील लोक आपलीं कर्मे न सोंडितां तीच युक्तीनें करून (सुप्रयुक्तेन कर्मणा)परमेश्वराची प्राप्ति करून घेतात असें म्हटलें आहे (मभा, शां. ३४८,५६). यावरून योगी आणि कर्मयोगी हे शब्दगीतेंत समानार्थक असून त्यांचा अर्थ ‘युक्तीनें कर्म करणारा’ असा आहहें उघड होतें. तथापि कर्मयोग’ हा लांबलचक शब्द वापरण्याऐवजीं ‘योग’ हा संक्षिप्त शब्दच गतेिंत व महाभारतांतहि अधिक वापरण्यांत येत असतो. “मी जो तुला हा योग सांगेितला, तोच पूर्वी विवस्वानाला सांगितला होता (गी. ४. १);विवस्वानानें मनूस सांगितला, पण तो योग पुढे नष्ट झाल्यामुळे आज नव्यानें तुला तोच योगसांगावेा लागला;’ असा ‘योग’ शब्दाचा भगवान् जेव्हां तनिदां उच्चार करिताततव्हां पातैजल योग विवक्षित नसून “कर्मे करण्यांची कांहीं एक प्रकारची विशिष्टयुक्ति, साधन किंवा मार्ग” असाच अर्थ घ्यावा लागतो. तसेंच गतेिंतील कृष्णार्जुनांच्या संवादास संजय जेव्हां ‘योग’ असे म्हणतो (गी. १८, ७५)तेव्हांहि तोच अर्थ अभिप्रेत आहे. श्रीशंकराचार्य हे स्वतः संन्यासमागीं होते तरी आपल्या गीताभाष्याच्या आरैभींच वैदिकू धर्माचे निवृति आणि प्रवृत्ति असे दोन भेद् सांगून ‘योग' शब्दाचा अर्थ भगवंतांना दिलेल्या व्याख्येप्रमाणे कधीं ‘सम्यग्दशेनेोपायकर्मानुष्ठानम्’ (गी. ४. ४२). तर कधीं ‘योगः युक्तिः’(गी.१०. ७) असा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे महाभारतांतहि “प्रवृतिलक्षणो येोगः ज्ञानं संन्यासलक्षणम्”–योग म्हणजे प्रवृत्तिमार्ग आणि ज्ञान म्हणजे संन्यास किंवा निवृत्तिमार्ग (मभा.अश्व.४३. २५)-असे या दोन शब्दांचे अर्थ अनुर्गातेंत स्पष्टकेले ओहत; व शांतिपर्वाचे अखेर नारायणीयोपाख्यानांत तर सांख्य व योग हे शब्द याच अर्थी अनेक वेळां आले असून, हे दोन मार्ग सृष्टयारंभीच भगवंतांनी कसे व कां निर्माण केले याचे वर्णन केलें आह (मभा.शां. २४० व३४८ पहा). भगवद्गीतेंत हाच नारायणाय किंवा भागवत धर्म प्रतिपाद्य आह हें पहिल्या प्रकरणांत दिलेल्या महाभारतांतील वचनावरून उघड आहे. म्हणून साख्य म्हणजे निवृति, आणि येोगू म्हणजे प्रवृति, असे या शब्दांचे `ज प्राचीन व पारीभाषिक अर्थ नारायणीय धर्मात आहेत तेच गीतेतहेि विवक्षित आहेत असे म्हणावें लागतें; व याबद्दल कांही शंका असल्यास “समत्वं योग उच्यते” किंवा “येाग:कर्मसु कौशलम्” या गीतेंतील व्याख्येनें आणि कर्मयोगेण योगिनाम्” इत्यादि वर दिलेल्या गीतावचनांनीं तिचे पूर्ण निरसन होऊन गीतेत योग हा शब्द प्रवृतिमार्ग म्हणजे ‘कर्मयेोग’ या अर्थीच वापरलेला आहे,