पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

va& गीतारहस्य अथवा कर्मयोग बुद्धि फलाशेमुळे कशी व्यग्र झालेली असत्ये याचे वर्णन केलं आहे (गी. २.४१४६). नंतर याप्रमाणें बुद्धि व्यग्र होऊं न देतां “आसक्ति सोड, पण कमें सोडून देण्याच्या आग्रहांत पडू नको” असें सांगून, ‘‘योगस्थ होऊन कर्म कर” (गी. २:४८) असा उपदशकेला आहे; व तेथेच “योग म्हणजे सिद्धि अगर आसिद्धि यांचे ठायीं समत्वबुद्धि” असा 'योग’ शब्दाचा अर्थ प्रथम स्पष्ट दिला आहे. नंतर “फलाशेनें कर्म करण्यापेक्षां समत्वबुद्धिचा हा योगच श्रेष्ठ होय” (गी. २.४९). *'बुद्धि सम असली म्हणजे कमीच्या पापपुण्याची बाधा कत्यसि लागत नाहीं म्हणून तूं हा ‘योग’ संपादन कर,” असें सांगितल्यावर लागलीच **योगः कर्मसु कौशलम्” (गी. २.५०) हें योगाचे लक्षण पुनः दिलेले आहे. यावरून कर्माचे पाप न लागतां कर्म करण्याची समत्वबुद्धिरूप जी विशेष युक्ति प्रथम सांगितली तिचेच नांव ‘कौशल' असून, या कौशल्यानें म्हणजे युक्तिनें कर्म करणें यासच गीतेंत ‘योग' म्हटले आहे, असें उघड दिसून येतं; आणि हाच अर्थ पुढे “योऽयं योगस्त्वया। प्रेोक्तः साम्येन मधुसूदन” (गी. ६.३३)-समतेचा म्हणजे समत्वबुद्धिचा जेो हा योग तुम्हीं मला सांगितला-या श्वलोकांत अर्जुनानें पुनः स्पष्ट केला आहे. ज्ञानी मनुष्यानें या जगांत कसें वागावें याच श्रीशंकराचायोच्याहि पूर्वीपांसून चालत आलेल्या वैदिक धमीप्रमाणें दोन मार्ग आहेत. पैकी, ज्ञान प्राप्त झाल्यावर सर्व कर्माचा स्वरूपतः संन्यास ह्मणजे त्याग करणे हा एक मार्ग असून, ज्ञानप्राप्ति झाली तरी कर्म न सोडितां त्यांच्या पापपुण्याची बाधा न लागेल अशा युक्तीनें तीच आमरणान्त करीत रहाणें हा दुसरा मार्ग आहे. या दोन मागॉस उद्देशूनच गीतेंत पुढे (गी. ५.२) संन्यास आणि कर्मयेाग अशीं पूर्ण नांवें योजिली आहेत. संन्यास म्हणजे सोड आणि योग म्हणजे जोड; अर्थात् कर्माच्या सोडजोडीचे हे दोन भिन्नभिन्न मार्ग होतात “सांख्य आणि योग” (सांख्ययोगौ) अशा दुसच्या संक्षिप्त संज्ञाहि पुढे(गी. ५.४) या दोन मार्गासच अनुलक्षून योजिलल्या आहेत.बुद्धि स्थिर करण्यासाठीं पातंजल योगांतील आसनांचे वर्णन सहाव्या अध्यायांत आहे खरें; पण तें कोणासाठीं ? तपस्व्याकरितां नव्हे, तर कर्मयोगी म्हणजे युक्तीनें कर्म करणाच्या मनुष्यास ‘समता’ ही युक्ति सिद्ध करून घेण्याकरितां सांगितले आहे. एरवीं “तपस्विभ्योऽधिका योगी” हें वाक्यच लागत नाही. तसेंच “तस्माद्योगी भवार्जुन” (६.४६) म्हणून जेो या अध्यायाचे शेवटी अर्जुनास उपदश आहे त्याचा अर्थहि “तूंपातंजल योगाचा अभ्यास करणारा ही” असा नसून, “योगस्थः कुरु कर्माणि” (२,४८), अगरत्यापुढे“तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्”(गी.२.५०) किंवा चवथ्या अध्यायाचे अखेर “योगमातिष्ठोत्तिष्ठभारत” (४.४२) यांशीं समानार्थक म्हणजे “युक्तीनें कर्म करणारा येोगी म्हणजे कर्मयोगी हो” असाच घेणें भाग