पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयेोग کرها त्यांतच त्याच्या फलाचा अंतर्भाव होतो; त्याचे दुसरें निराळे फल नाहीं. पण यज्ञार्थ केलेली हीं कर्मेजरी स्वतंत्रफलदायक नसली तरी खुद्द यज्ञानें स्वर्गप्राप्ति (म्हणजे मीमांसकांच्या मतें एक प्रकारची सुखप्राप्ति)होत्ये व ती स्वर्गप्राप्ति होण्यासाठीच यज्ञकती पुरुष आवडीनें यज्ञ करीत असतो. म्हणून खुद्द यज्ञहें कर्म पुरुषार्थ’ या सदरांत पडतें. ज्या वस्तूविषयीं मनुष्याची प्रीति असून जी प्राप्त व्हावी अशी त्याची इच्छा असत्ये तसि ‘पुरुषार्थ’ म्हणतात (जै. सू. ४.१ १ व २).यज्ञालाच 'क्रतु' हा पर्याय शब्द आहे; म्हणून ‘यज्ञार्थ’ याऐवजी ‘कत्वर्थ’ हा शब्दहि वापरण्यांत येतो; व मग यज्ञार्थ’ (कत्वर्थ)म्हणजे स्वतंत्ररीत्या फल नदेणारी अतएव अबंधक, आणि ‘पुरुषार्थ' म्हणजे पुरुषाच्या फायद्याचीं अतएव बंधक, असे, सर्व कर्माचे दोन वर्ग होतात. संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांत सर्व वर्णन यज्ञयागादिकांचेच आहे ऋग्वेदसंहिर्तेतईद्रादि देवांचीं स्तुतिपर सूक्ते आहेत खरीं;पणत्यांचा विनियोग यज्ञाचे वेळींच कर्तव्य असल्यामुळे सर्वश्रुतिग्रंथ यज्ञादिकर्मप्रतिपाद्कच आहत,असेंमीमांसक म्हणतात. वेदांतील यज्ञयागादिक कर्म केलें म्हणजे स्वर्गप्राप्ति होत्ये, एरवीं होत नाहीं, मग ते यज्ञयाग तुम्ही अज्ञानानें करा किंवा ब्रह्मज्ञानपूर्वक करा, असें या कर्मठ, याशिक, किंवा नुस्त्या कर्मवाद्यांचे म्हणणे आहे. उपनिषदांत हे यज्ञ जरी ग्राह्य धरिले आहत तरी त्यांची योग्यता ब्रह्मज्ञानापेक्षां खालच्या पायरीची ठरवून त्यामुळे स्वर्गप्राप्ति झाली तरी खरा मोक्ष मिळण्यास ब्रह्मज्ञानच अवश्यक आहे असें प्रतिपादन केले आहे. भगवद्गीतेच्या दुसच्या अध्यायांत ‘वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः”(गी.२.४२) वर्गैरे यज्ञयागादे जीं काम्य कर्मे वर्णिलं अहृित तीं ब्रह्मज्ञानाशिवाय केलेलीं वरील यज्ञयागादिक कमें होत. तसेंच ‘‘यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः”-यज्ञार्थ केलेलीं कर्मे बंधक नाहीत, बाकीचीं सर्व कर्मे बंधक आहत (गी.३.९),-हाहि मीमांसकांच्याच मताचा अनुवाद आहे. या यज्ञयागादि भदानें मनुस्मृत्यादि धर्मग्रंथांतून वर्णिलेली आहेत,-उदाहरणार्थ, क्षत्रियास युद्ध, वैश्यास वाणिज्य वगैरे; वहीं प्रथमतः स्मृतिग्रंथांतूनच व्यवस्थेशीर प्रतिपादिली असूल्यामुळे त्यांस स्मार्तकर्मे' किंवा ‘स्मार्ते यज्ञ'असेंहि म्हणतात. या श्रौतस्मार्त कर्माखेरीज कांहीं धार्मिककर्मे,-उदाहरणार्थ व्रतं उपोषणे वगैरे-केवळ पुराणांतूनच पहिल्यानें विस्तारानें प्रतिपादिली असल्यामुळे त्यांस“पौराणिककर्मे'अशी संज्ञादेतांयेईल या सर्व कर्माचे पुनः नित्य, नैमितिक आणि काम्य असे भद केलेले आहत. नहमी केलेंच पाहिजे असें जें स्रानर्सध्यादिक कर्म तें नित्यकर्म होय. हें केल्यानें कांहीं विशेष फल किंवा अथैसिद्धि हेोत नाहीं; पण न केले तर मात्र दोष घडतो. नैमितिक म्हणजे कांहीं कारण पूर्वी उपास्थत झाल्यामुळे जें करावें लागतें तें कर्म. उदाहर