पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा TMፃ ओनक आहेत, तरीवेदान्तांतील गहन तत्त्वज्ञानाच्या आधारें ‘कार्याकार्यव्यवस्थिति' लावणारा गीतेसारखा दुसरा प्राचीन ग्रंथ निदान सध्यां तरी संस्कृत वाङ्मयांत आढळून येत नाही. ‘कार्यकायव्यवस्थिति' हा शब्द आमच्या पदरचा नसून गीतेंतलाच आहे (गीता १६.२४), हें गीताभक्तांस सांगावयास नको. भगवद्गीतेप्रमाणे तहि ज्ञानमूलक प्रवृातमार्गाचाच वसिष्ठांनीं रामास अखेर उपदेश केला आहे; पण गीतेच्या मागाहूत झालेल्या व गीतेचेच अनुकरण करणाच्या असल्या ग्रंथांनी गीतेची जीी अपूर्वता वर सांगितली तिला कांहीं बाध येत नाहीं.