पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

イ& गोतारहस्य अथवा कर्मयोग वेळीं शोभतात, इतकेंच नव्हे, तर अशा प्रकारच्या प्रसंगांखेरीज त्यांची खरी परीक्षाहिं होत नाही. शाळूसोबती पुष्कळ असतातः पण “निकषग्रावा तु तेषां विपत्”-संकटकाल हीच त्यांच्या परीक्षेची खरी कसोटी होय. ‘प्रसंग' या शब्दांतच देशकालाखेरीज पात्रापात्रतादि गोष्टंचाहि समावेश होते. समतेपेक्षां दुसरा कोणताच गुण श्रेष्ठ नाहीं. “समः सर्वेषु भूतेयु”हें सिद्ध पुरुषाचे लक्षण होय, असें भगवद्गातंतच स्पष्ट सांगितले आहे. पण समता म्हणजे काय ? एखादा पुरुष सरसट्टा म्हणजे येाग्यता न पहातां सर्वास सारखेंच दान करूं लागला तर आपण त्यास शहाणा म्हणू का वेडा म्हणू { भगवद्गीतेतच “देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं विदुः” देश काल व पात्रता पाहून दिलेलें जें दान तेंच सात्विक होय (गी १७.२०.)-असा या प्रश्नाचा निर्णय केला आहे. कालाची मर्यादा केवळ वर्तमानकालापुरतचि असत्ये असें नाही. काल जसजसा बदलतो तसतसे व्यावहारिक धर्मातहि फरक पडत जातात, आणि त्यामुळे एखाद्या प्राचीन कालच्या गोष्टीच्या योग्यायोग्यतेबद्दल निर्णय करणे असल्यास तत्कालीन धर्माध मैसमजुतीचाहेि अवश्य विचार करावा लागतो. अन्ये कृतयुगे धर्मास्नेतायां द्वापरेऽपरे । अन्ये कॅलियुगे नृणां युगच्हासानुरूपतः ॥ “युगमानाप्रमाणे कृत, त्रेता, द्वापरं व कॅलि यांतील धर्महि भिन्नभिन्न असतात,” असें मनु.(१.८५) व व्यास सांगत आहेत (मभा. शां. २५९. ८):आणि पूर्वकालीं स्रियांस विवाहाची मर्यादा नसून त्या या बाबतीत स्वतंत्र व अनावृत होत्या, परंतु पुढे या आचाराचे दुष्परिणाम नजरेस आल्यावर श्वेतकेतूनें विवाहाची मर्यादा घातली (मभा.आ. १२२) किंवा सुरापानाबद्दलचा निषेध प्रथम शुक्राचार्यानीं प्रवृत केला, अशा कथा महाभारतांतच वणिल्या आहेत ( मभा. आ. ७६ ). अर्थात् हे निबंध ज्या वेळीं अमलांत नव्हते त्यावेळचे धर्माधर्म व त्यानंतरचे धर्माधर्म यांचा निर्णय भिन्न रतीिनेंच केला पाहिजे; व त्याचप्रमाणें वर्तमानकाळी असलेले धर्म जर पुढे बदलले तर त्याबरोबर भविष्यत्कालीन धर्माधर्माचे विवेचनहि निराळ्या धेारणावर केलें जाईल. कालमानाप्रमाणेच देशाचार, कुलाचार, किंवा ज्ञातिधर्महि या बाबतींत जमेस धरावे लागतात;कारण, आचार हें सर्व धर्माचे मूळ होय. तथापि आचाराआचारांतहि मेळ नसून- 한 न हि : कश्विदाचर:संप्रवर्तते । तेनैवोन्यः प्रभवति सोऽपरं बाधते पुनः ॥ “ सर्वांना सर्वदा एकसारखाच हितकारक असा आचार सांपेर्डत नाही. एक आचार घ्यावा तर दुसरा त्याच्या वरचढ असतो, व हा दुसरा आचार पत्करावा तर तो