पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

警臀 गीतारहस्य अथवा कमैयेोग तोंडांतून त्यांस उद्देशून ‘वेट्यांनों’ हे शब्द सहजगत्या बाहेर पडले.-“पुत्रका इति होवाच ज्ञानेन परिगृह्य तान्.” मग काय विचारतां ? सर्व म्हाताच्यांच्या तळपायांची आग मस्तकास पोंचून “ हा पोर माजला ! ” असें त्यांनी ठरविलें; आणे त्याचे योग्य शासन व्हावें म्हणून देवांकडे फिर्याद दिली. देवांनीीं उभयपक्षांचे म्हणणें एकून “ आंागरस तुम्हांस बोलला तेंच न्याय्य ” असा अखेर निकाल दिला ! कारण- ~ * न तेन वृद्धे भवति येनास्य पलिते दिारः । येो वै युवाप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ॥ “डोकें पांढरें झालें म्हणजे तेवढयानेंच एखादा मनुष्य वृद्ध होत नाहीं; तरुण असला तरी जो ज्ञानवान् त्यालादेव म्हातारा समजतात” (मनु. २.१५६; तसेंच मभा. वन. १३३. ११;शल्य. ५१.४७पहा). मनु व व्यास यांसच नव्हे तर बुद्धासहि हें तत्त्वमान्य झालेलं होतें. कारण, मनुस्मृतीतील वरील»ठोकाचा पहिला चरण अक्षरशः ‘धम्मपद': नांवाच्या प्रसिद्ध नीतिपर पाली बौद्धग्रंथांत आलेला असून (धम्मपद २६०), पुढे केवळ वयानेंच जो परिपक्व झाला त्याचे जिणें व्यर्थ होय व खरा धर्मिष्ठ ववृद्धहोण्यास सत्य, अहिंसा इत्यादि सद्गुण अवश्य पाहिजेत, असें म्हटलें आहे; आणि ‘चुल्लवग्ग' नांवाच्या दुसच्या ग्रंथांत,धर्मनिरूपण कराणारा भिक्षु नवीन असला तरी स्वतः उच्च आसनावर बसून जुन्या म्हणजे आपल्यापूर्वी दीक्षा घेतलेल्या म्हणजे वयेोवृद्ध अशा भिक्षूसहेि त्यानें धभेपिदेश करावा, अशी बुद्धानेंच परवानगी दिलेली आहे(चुल्लवग्ग ६. १३.१ पहा).प्रल्हादानें आपला पिता जो हिरण्यकशिपु त्याची अवज्ञा करून भगवत्प्राप्त करून घेतल्याची पौराणिक कथा सर्वश्रुत आहे; व त्यावरून धाकट्यामोठ्याचेच नव्हे, तर पितापुत्राचे सर्वमान्य नातेंहि कधीकधी दुसरे वरचढ संबंध उपास्थत होऊन तेवढ्यापुरतें नाइलाजास्तव क्षणभर विसरावें लागतें असे दिसून येईल. पण असे प्रसंग प्राप्त झालेले नसतांहि हाच न्याय हवा तेथें लागू करून एकदा चारगट पोर आपल्या बापास शिव्या देऊं लागला तर

  • “Iraq.' Tirosh of assist Sacred Books of the East (HTo) Vol X, यांत दिलेलें असून इंग्रजी भाषांतर त्याच V6 XVII आणि XX मध्ये प्रसिद्ध झालें ऑहे. मराठींतहिरा. रा, यादवराववार्वीकर यांनीं धम्मपदाचे एक भाषांतर केले असून तें प्रथम कोल्हापुरच्या ग्रंथमालंत व नंतर पुस्तकरूपानें प्रसिद्ध झाले आहे. धम्मपदांतील पाली श्लोक पुढे लिहिल्याप्रमाणे आहेन तेन थेरो ह्येोति येन्स्स पलितं सिरो । परिपको वयो तस्स् मोघजिण्णो ति वृच्चति ॥ . *थेर’ हा शब्द बुद्ध भिक्षूस लावितात. तो संस्कृत ‘स्थविर' याचा अपभ्रंश आहे.