पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

イ* गीतारहस्य अथवा कर्मयोग “शरीरत्यागं लोकाहतार्थं भवान् कर्तुमर्हति ”-महाराज ! सर्व लोकांच्या कल्याणा साठी आपणदेहत्याग करावा,-अशी त्याला विनंतिकेल्यावर दधीाच ऋषंनी मोठ्या आनंदानें प्राण सोडेिले, आणि आपल्या अस्थि देवांस दिल्या: अशा कथा अनुक्रमें भारताच्या वनपर्वात व शांतिपर्वीत दिल्य। आहत ( वन. १०० व १३ १; शां. ३४२ ). कर्णीवरोबर जन्मलेली त्याची सहज कवचकुंडलें हरण करण्याकरितां इंद्र ब्राह्मणाच्या रूपानें दानशूर कर्णाकड भिक्षा मागण्यास येणार हें कळल्यावर, सदर कवचकुंडले कोणासहिं दान न देण्याबद्दल, सूयीनें कर्णास अगाऊ इषारा दिला. आणि असें बजावलें कीं, तूं दानशूर म्हणून जरी तुझी कीर्ति आह, तरी कवचकुंडलं दान करण्यापासून तुझ्या जीविताला धोका येणार असल्यामुळे तूंती कोणासहिदेऊंनकोस. कारण, मेल्यावर कीतींचा काय उपयेोग?-“मृतस्य कीत्या कि कार्थम् ?” सूर्याचे हें म्हणणें ऐकून “जीवितेनापि मे रक्ष्या कीर्तिस्तद्विद्धि में व्रतभू ”-जीव गला तरी बेहेतर, पण कीर्तीचे रक्षण करणें हेंच माझें व्रत होय,-असा कर्णानें त्यास खडखडीत जबाब दिला आहे (मभा. वन. २९९.३८). किबहुना मेलास तर स्वर्गास जाशील, आणिं जिंकलस तर पृथ्वी भोगशाल इत्यादि क्षात्रधर्म (गी. २. ३७) किंवा ‘‘स्वधर्मे निधनं श्रेयः ” (गी.३. ३५) हां सिद्धान्तर्हीं याच तत्त्वावर् अवलैबून आह; आणि त्याला अनुसरूनच “ कीर्ति पाहें जातां सुख नाहf । मुख पाहतां कीर्तिनाहीं ॥ ” (दास. १२. १०. १९;१९.१०.२५), म्हणून “देह त्यागतांकीर्ति मागें उरावी । मना सज्जना हचेि क्रीया करावी ।{” असा श्रीसमर्थ रामदासस्वामीचा उपदश आहे. परंतु परोपकारानें कीर्ति मिळतं हें जरी खरें असलें तरं भल्यावर कीतीचा काय उपयेोग ? अथवा संभावित पुरुषाला दुष्कीर्तिपेक्षां मरण (गी.२.३४). किंवा जीवितापक्षां परोपकार अधिक प्रिय कां वाटावा ? या प्रश्नांची थोग्य उत्तरें देण्यास आत्मानात्मविचारांत शिरल्याखेरीज दुसरा मार्ग नाही. आणि उतरें दिलीं तरीहि कोणत्या प्रसंगी जीवावर उदार होणे योग्य आणि कोणत्या प्रसंगी अयेाग्यहं समजण्यास कमीकर्मशास्राचाहेि त्याबरोबरच विचार करावा लागतो. नाहीपेक्षां जीवावर उदार होण्याचे यश मिळणें दूर राहून मूर्खपणानें आत्महत्या केल्याचे पाप मात्र पदरांत पडण्याचा संभव असते. माता, पिता,गुरु वगैरे वंद्य व पूज्य पुरुषांची देवाप्रमाणे पूजा आणि शुश्रूषा करणें हाहि सामान्य व सर्वमान्य धर्मोपैकीच एक प्रधान धर्म समजला जातो. कारण, तसें न होईल तर कुंटुंबाची, गुरुकुलाची, किंवा एकंदर समाजाचाहिं नीट व्यवस्था कधींच रहाणार नाही. म्हणून स्मृतिप्रथांतूनच नव्हे तर उपनिषदांतूनहि “सत्यं वद धर्म चर” असें सांगून नंतर पुढे“मातृदेवो भव । पितृदेवो भव। आचार्यदेवो भव।” असा शिष्याचे अध्ययन पुरें होऊन ती परत घरीं जाऊं लागला म्हणजे प्रत्येक गुरु