पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा × ] कावळेहि पुष्कळ वर्षे जगतात. म्हणून वीरपत्नी विदुला आपल्या पुत्रास असें सांगत आहे की, अंथरुणावर पडून कुजत किवा घरांत शंभर वर्ष फुकट धुमसत पडण्यापेक्षां घटकाभर पराक्रमाची ज्येोत दाखवून मेलास तरी बरें,-“मुहूर्त ज्वलितं श्रेयो न च धूमायितं चिरं”(मभा.उ.१३२.१५.). आज नाही उद्यां, निदान शंभर वर्षांनीं तरी, मृत्यु जर कोणांसहि चुकत नाही (भाग.१०.१.३८; गी.२.२७), तर मग त्याबद्दल भीति किवा आक्रोश, डर किवा रड कशाला ? अध्यात्मशास्राप्रमाणें पाहिलें तर आत्मा नित्य असून त्याला कधाच मरण येत नाही. म्हणून मरणाचा विचार करितेवेळी प्रारब्धकर्मानुसार प्राप्त झालेल्या शरीराचाच काय तो प्रश्न शिल्लक राहतेो. हें शरीर बोलून चालून नाशवंत; पण आत्म्याच्या कल्याणार्थ जें कांहा या जगांत करावयाचे त्यास नाशवंत मनुष्यदेह हेंच काय तें एक साधन असल्यामुळे “आत्मानं सततं रक्षेत् दारैरपि धनैरपि”-बायकामुलें किंवा संपात यांपेक्षां आपण आपल्या स्वतःचे प्रथम रक्षण करावें (मनु.७.२१३) असें मनूनेंहि म्हटले आहे. तथापि हा दुर्लभ पण नाशवंत मानवदेह खर्ची घालून यापक्षांहिं अधिक शाश्वत अशा एखादी वस्तुजव्हां प्राप्त करून घ्यावयाचा असततेव्हां, -उदाहरणार्थ, देवासाठी, धर्मासाठी,सत्यासाठा, आपला बाणा, व्रत किंवा व्रीद राखण्यासाठी, अब्रुसाठी, यशासाठा अथवा सर्वभूतहितार्थ,-अनेक महात्म्यांनी अनेक प्रसंगीं या तीव्र कर्तव्याग्नीत आनंदानें आपल्या प्राणांचीहि आहुति दिलेली आहे ! वसिंष्ट्राच्या धेनूचें सिंहापासून रक्षण करण्यासाठी सिहास आपला देह बळी देण्यास तयार झालेल्या दिलीपानें आपल्यासारख्या पुरुषांची “पांचभौतिक शरीरासबंधानें अनास्था असते, यासाठी तूं माझ्या जड शरीरापेक्षा माझ्या यशःशरीराकडे पहा”(रघु. २.५७), अशी सिहाची प्रार्थना केल्याचे रघुवंशांत म्हटले आहे; आणि सर्पाचे जीव बचावण्यासाठी जीमूतवाहनानें गरुडास स्वतःचा देह अर्पण केल्याची कथा कथासरित्सागरांत आणि नागानंद नाटकांत वर्णिली आहे. मृच्छकटिक नाटकांत (१०.२७) चारुदत्त असें म्हणतो कीं नू भीतो मर्णास्मि केवलं दूषितं यशाः । विद्युद्धस्य द्दि मे मृत्युः पुत्रजन्मसमः किल ॥ “मी मरणाला भीत नाहीं; कॅीतीला व् ऑली एवढेच मला दुःख वाटतें. कीर्ति शुद्ध राहून मृत्यु आला तर तो मला खरोखर पुत्रेात्सवासारखा आहे.”आणि याच तत्त्वावर शिबि राजानें आपणास शरण आलेल्या कपोताचे रक्षण करण्यासाठी, श्येन पक्ष्याचे रूप धारण करून सदर कपोताच्या पाठीस लागलेल्या धमास आपल्या स्वत:च्या शरीराचे मांस तेोडून दिलें, वृदेवांचा शत्रू जो वृत्र त्याला मारण्याकरिता दधीचि ऋषीच्या हाडांचे वज्र पाहिजे होतें, म्हणून सर्वदेवांनीं सदर ऋषीकडे जाऊन