पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा ३३ अशा प्रसंगांपैकीं कां#ीं प्रसंग प्रल्हादानें वर्णिले आहेत. तथापि हे प्रसंग कसे ओळखावे याचे तत्त्व प्रल्हाद सांगत नाही. पण प्रसंग न ओळाखतां या अपवादांचा जर कोणी उपयोग करील तर तें दुर्वर्तन होतें. ह्मणून, हे प्रसंग कसे ओळखावे यांतील तत्त्व समजून घेणें अत्यंत महत्त्वाचे आहे. जगांतील सर्व देशात व सर्व धर्मात आबालवृद्ध स्रीपुरुषांस सर्वतोपरी मान्य व प्रमाणभूत झालेलें दुसरे तत्त्व ‘सत्य' होय. सत्यांची महती काय वर्णावी ? सर्व सृष्टेि उत्पन्न होण्यापूर्वी ऋतं’ व ‘सत्यं’ उत्पन्न झाला असून त्या सत्थानेच आकाश, पृथ्वी, वायु वगैरे पंचमहाभूतेंहिं अांवरुन धरिलेली आहेत असा वेदांतून सत्याचा माहमा गाइला आहे."ऋतं च सत्यं चाभाद्धात्तपसोऽध्यजायत”(ऋ.१०.१९०.१), ‘सत्यनोत्ताभता भूमः” (ऋ.१०.८५.१), इत्यादि मंत्र पहा. 'सत्य' या शब्दाचा धात्वर्थच ‘असणारें' ह्मणजे ‘कधीहि नार्हसेि न होणारें” अथवा “त्रिकाल अबाधित रहाणारें” असा आहे; आणि म्हणूनच ‘सत्यापरता नाही धर्म । सत्थ तेंचि परब्रह्म” असें सत्याचे यथा महत्त्व वार्णले आहे. ‘नास्ति सत्थात्परो धर्मः’ (शां.१६२.२४), हें वचन महाभारतात अनेक ठिकाणी आलेले असून आणखी असेंहि सांगितलें সান্ত कीं- ه به * ● अश्वमुध्यसद्दस्र च सत्य व तुळया ध्रुत्मनः। अश्वमेधसह्वस्राद्धि सत्यमेव विशिष्यते ॥ “हजार अश्वमेध आणि सत्य यांची तागडात घालून परीक्षा केली, तेव्हां सत्यच अधिक भरलें!” (अ.७४.१०२).सामान्य रात्यासंबंधी हें वर्णन झाले. सत्य बोलण्यासंबंधी मनु (४. ६५६)आणखी वूिशेष असे म्हणतो कॉ-- वाच्यथो नेियताः सर्वे वाङ्मूला वItग्वनिःस्रुताः । तां तु यः स्तेनयेद्धं च स स्मवंस्तयकृन्नरः । *'मनुप्यमात्राचे सर्व व्यवहार वार्णानें चालले आहेत. एकमेकंांचे विचार एकमेकांस कळविण्यास शब्दसारखें दुसरें साधन नाही मग या सर्व व्यवहाराला आश्रयीभूत असा जो हा वाणीच मूळ झरा तोच जो गढूळ करतो, अर्थात् वाणीशीं जेो प्रतारणा करितो, तो मनुष्य सर्वे मुद्दलाचीच एकदम चोरी करणारा होय.” म्हणून ‘सत्यपूतां वदद्वाचे'-(मनु.६.४६)-जें कांहीं बोलावयाचें तें सत्याने पवित्र झालेले असेंच बेोलत जा -असे मन्नें सांगितले आहे. उपनिषदांतहि सत्यं वद । धर्म चर ' (तै. १.११.१) असें इनर धर्मपेक्षां सत्यालाच पहिलें स्थान दिले असून शरपंजेरी पडलेल्या भीष्मांनी शांति व अनुशासन पर्वीत युधिष्ठिरास सर्व धर्माचा उपदश कल्यावर प्राण साडण्यापूर्वं ‘‘सृत्येषु यतितव्यॆ वः सत्यं ह् िपरमं बलं’’ असॆ सकल धर्माचे सारभूत म्हणून सर्वास शेवटी एक सत्यच पाळण्यास सांगितले आहे गी.र. ३