पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ गीतारहस्य अथवा कर्मयेोग शेंकडों अत्यल्प जीव भरलेले आहत त्यांची हत्या कशी बंद होणार ४ महाभारतांत (शां.१५.२६), अर्जुन म्हणतो कीं--- सूक्ष्मयोनीान भूतानि तर्कगम्यानि कानिधित्। पक्षेमणे(sपि निपेोतेन येषां स्यात् स्कन्धपर्ययः ॥

  • ‘डोळ्यांनीं न दिसले तरी तकौनें ज्यांचे अस्तित्व समजतें असे सूक्ष्म जंतु या जगांत इतके भरले आहत कीं,आपण आपल्या डेळियांच्या पापण्या हालविल्या तर तेवढयानेंच या जीवांचे हातपाय मोडून पडतील!” मग हिसा करूं नका, हिसा करूं नका, असें तोंडानें म्हणण्यांत काय हंशील? हाच सारासार विचार करून मृगयेचे अनुशासनपर्वात (अनु.११६)समर्थनकेले आहे. वनपर्वात अशी कथा आहे की, क्रोधानें एका पतिव्रता स्रीचे भस्म करण्यास उद्युक्त झालेल्या ब्राह्मणाचा प्रयत्न जेव्हांसफल झाला नाहीं तेव्हां तो त्या स्रीस शरण गेला; आणि मग धर्माचे खरे रहस्य समजून घेण्यासाठी त्या स्रीनें सदर ब्राह्मणास एका व्याधाकडे पाठविलें. हा व्याध मांसविक्रय करणारा असून परम मातृपितृभक्त होता. व्याधाचा हा धंदा पाहून ब्राह्मणास अत्यंत विस्मय व खेद झाला. तव्हां व्याधीनें अहिसेचें खरं तत्त्व त्यास सांगून त्याची नीट कानउघाडणी केली ! जगामध्यें कोण कोणाला खात नाही ? ‘जीवेो जीवस्य जीवनम्”(भाग.१.१३.४६)हा व्यवहार नित्य चालू असून,आपत्काली तर ‘ प्राणस्यान्नमिदं सर्वम्”असें स्मृतिकारांनीच नव्हे (मनु.५.२८;मभा.शां. १५.२१), तर उपनिषदांतूनहि स्पष्ट सांगितलें आहे (वेसू.३.४.२८:छां.५.२.१:वृ. ६. १.१४). सर्वानीं हिंसा सोडून दिल्यावर मग क्षात्रधर्म तरी कसा राहणार ? आणि क्षात्रधर्मगेला म्हणजे प्रजेस त्राता नाहींसा होऊन, वाटेल त्यानें वाटेल त्यास खाऊन टाकावें असा प्रसंग यणार. सारांश, नीतीच्या सामान्य नियमानें नेहमीच काम भागत नसून, नीतिशास्रांतील मुख्य म्हणजे अहिंसेच्या नियमांतहि कर्तव्याकर्तव्याचा तारतम्य विचार सुटत नाही.

अहिंसाधर्माला धरूनच क्षमा, शांति, दया हेगुण शास्रांत सांगितले आहेत. पण सर्व ठिकाणीं ही शांति कशी चालणार ? नेहमी शांत रहाणाच्या मनुष्याची बायकापेोरें देखाल इतर लेक उघड हरण केल्याखेरीज रहाणार नाहात असें कारण प्रथम दाखवून, पुढे महाभारतांत प्रल्हाद आपल्या नातवास म्हणजे बलीस असें सांगतेो कीं न श्रेयः सततं तेज्ञे न नित्ये श्रेयसी क्षमा । तस्माझित्यं क्षमा तात पंतःि द्विता ॥ “नेहमींच क्षमा किंवा नेहमीच तापटपणा श्रेयस्कर होत नाहीं. यासाठींच बाबा ! ज्ञात्यांनी क्षमस अपवाद सांगितले आहेत” (वन. २८. ६, ८). नंतर क्षमेस येोग्य