पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

マゞ गीतारहस्य अथवा कर्मयोग. अथै पूर्वीच सत्य म्हणून निश्चित ठरला तोच सर्वत्र प्रतिपादिला आहे असें दाखवितांना मीमांसाशास्राच्या कांहीं नियमांस बाध आला तरी वरील दृढ समजुतीमुळे त्याचे या टीकाकारांस कांहींच महत्त्व वाटत नाहीं.हिंदुधर्मशास्रावरील मिताक्षरा, दायभाग वगैरे ग्रंथांतून स्मृतिवचनांचैा व्यवस्था किंवा एकवाक्यता याच तत्त्वावर नाहीं. ख्रिस्ती व महंमदी धर्माचे आदिग्रंथ बायबल व कुराण यांचीहिसंदर धर्मातपुढे उद्भवलेल्या शेंकडों सांप्रदायिक ग्रंथकारांनी अशाच अर्थातरं केलेली आहत; आणि बायबलच्या जुन्या करारांतील कांहीं वाक्यांचे अर्थ याच न्यायानें यहुदी लोकांच्या अर्थाहून खिस्तभक्तांनी निराळे कल्पिलेले आहत. किंबहुना एखाद्या विषयावरप्रमाणभूत ग्रंथ किंवा लेख कोणते हें जेथे जेथे म्हणून आगाऊच कायम ठरलेले असतें, आणि प्रमाणभूत झालेल्या या नियमित ग्रंथांच्या आधारेंच पुढील सर्व गोष्टींचा निर्णय करावयाचा असते, तेथें तेथे ग्रंथार्थनिर्णयाची हाच पद्धत स्वीकारितात असें आढळून येतं. अलीकडील बडेबडे कायदेपंडित, वकील व न्यायाधीश हे पूर्वीच्या प्रमाणभूत कायदेग्रंथांची किंवा निवाड्यांची आपआपल्यापरी कित्येकदां जी ओढाताण करीत असतात त्यांतील बीज हेंच होय. शुद्ध लौकिक बाबतींत जर ही स्थिति, तर उपानेषदॆ व वदान्तसूत्रं आाणि त्याबरोबरश्च प्रस्थानत्रयतिील तिसरा ग्रैथ भगवद्गीता यांवर सांप्रदायिकदृष्टया निरनिराळीं भाष्यं झालली आहत याचे आश्चर्य वाटण्याचे कांहीं कारण नाहीं. पण ही सांप्रदायिक पद्धत सेोडून वर सांगितल्याप्रमाणें भगवद्गीतेच्या उपक्रमोपसंहाराादकांकडे नजर दिली तर असें आढळून येईल कीं,भारती युद्धासप्रत्यक्ष आरंभ होण्यापूर्वी कुरुक्षेत्रावर दोहों बाजूंकडीलसैन्यें लढाईस सज होऊन आतां एकमेकांवर शस्रसंपात करणार, इतक्यांत एकाएकीं ब्रह्मझानाच्या गोष्टी सांगून ‘विमनस्क’ व संन्यास घेण्यास तयार झालेल्या अर्जुनास आपल्या क्षात्रकर्मास प्रवृत्त करण्यासाठीं भगवंतांनी गीता उपदेशली आह. दुष्ट दुर्योधनास सहाय होऊन आपल्याबरोबर लढण्यास कोण कोण आले आहतहें जव्हां अर्जुन पाहूं लागला,तेव्हांवृद्ध पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य व गुरुपुत्र अश्वत्थामा, प्रतिपक्षी झाले तरी बांधव असे कौरव, आणि सुहृत् आप्त, सोयरे, मित्र, माम, काक, मेहुणे, राजे, राजपुत्र वगैरेत्याच्या दृष्टीस पडले; आणि केवळ हस्तिनापुरचे राज्य मिळविण्यासाठी यांसमारून आपणास कुलक्षयादि महत्पापें करावीं लागणार हा विचार त्याच्या मनांत उद्भवून त्याचे चित्त एकदम क्षुब्ध झाले. एके बाजूस क्षत्रियधर्म ‘लढाई कर' म्हणून सांगत होता, आणि दुसरीकडे पितृभक्ति, गुरुभक्ति, बंधुप्रेम, सृहूत्प्रीति हे धर्म त्यास खेचून माघारी ओढीत होते ! लढाई करावी तर ती आपसांतलीच असल्यामुळे पितामह, गुरु व आप्त यांची हत्या केल्याचे घोर