पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवेश, १९ म्हणून जे जे आचार वर्णिलेले आहेतते तेच,-म्हणजे मायावादात्मकच अद्वैत व कर्मसंन्यास, मायासत्यत्वप्रतिपादक विशिष्टाद्वैत व वासुदेवभक्ति, द्वैत व विष्णुभक्ति, शुद्धाद्वैत व भक्ति, शांकराद्वैत व भक्ति, किंवा पातंजल योग व भक्ति, किंवा नुस्ती भक्ति, नुस्ता योग, अगर नुस्तें ब्रह्मज्ञान असे अनेक प्रकारचे केवळ निवृत्तिपर मोक्षधर्मच-गीतेंत प्रतिपाद्य आहेत, असा निरनिराळ्या सांप्रदायिक भाष्यकारांनीं व टीकाकारांनी आपआपल्यापरी गीतार्थाचा निश्चय केला आहे. भगवद्गीतेंत कर्मयोग प्रधान मानिला आहे असें कोणीच म्हणत नाहीं. आमचेंच नव्हे, तर प्रसिद्ध महाराष्ट्रकवि वामनपंडित यांचेहि मत असेंच असून, गीतेवरील आपल्या ‘यथार्थदीपिका’ नामक विस्तृत मराठी टीकेच्या उपोद्घातांत त्यांनी प्रथम पुरी अजी भगूवंतजी । या कलियुगामाजीं ॥ जो तो गीतार्थ योजी । मतानुरूपं ॥ याप्रमाणे लिहून नंतर कोण्या मिसें तरी कोणी । गीतार्थ अन्यथा वाखाणी ॥ मज नावडे ती थोरांचीहि करणी । काय करूं जा भगवंता ॥ असें भगवंताजवळ गान्हाणे गाईलें आहे. अनेक सांप्रदायिक टीकाकारांच्या भिन्नभिन्न मतांचा हा गलबला पाहून त्यावर कित्येकांचे असें म्हणणे आहे की, ज्या अर्थी हे निश्चयानें सांगतां येत नाहीं, त्या अर्थी वरील सर्व मोक्षसाधनांचे-व त्यांतहि विशेषतः कर्म, भक्ति आणि ज्ञान या तिहींचें-स्वतंत्र रीतीनें पृथक् पृथकू थोडक्यांत छा मोक्षेोपायांचीं हीं वर्णनें पृथक् पृथकू म्हणजे तुटकी नसून त्या सर्वोची गीतेंत एकवाक्यता करून दाखविली आहे कित्येक प्रतिपादन करितात; आणि सरतेशेवटीं कित्येक असेंहि म्हणणारे आहेत कीं, गीतेंतील ब्रह्मविद्या वरवर यद्यपि सुलभ दिसली तरी तींतील खरें मर्म अत्यंत गूढ असल्यामुळे तें गुरुमुखाखेरीज कोणासहि कळावयाचे नाहीं (गी. ४. ३४), आणि गीतेवर टीका जरी पुष्कळ झाल्या तरी गीतेंतील गूढार्थ समजण्यास गुरुमुखाखेरीज दुसरा मार्ग नाहीं. याप्रमाणें खुद्द महाभारतकारांनी प्रतिपादन केलेलें भागवतधर्मानुसारी म्हणजे * निरनिराळ्यासांप्रदायिक आचार्याचींगीतेवरील भाष्यें वत्या संप्रदायांतील इतर टीका मिळून पंधरा टीका मुंबईसगुजराथी प्रिन्टिग प्रेसचे मालक : आहेत. निरनिराळ्या टीकाकारांचे अभिप्राय एकदम कळण्यास हा ग्रंथ फार आहे.