पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. संतांचीं उठिछष्टं बोलतों उत्तरे । काय म्यां पामरें जाणावें हें ॥ तुकाराम. girಳ್ಲಕ್ಡ अनेक संस्कृत भाष्यें, टीका किंवा प्राकृत भाषांतरें अगर विस्तृत सर्वमान्य निरूपणें असतां, हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कारण काय हें जरी ग्रंथारंभींच सांगितले आहे, तरी ग्रंथांमधील प्रातपाद्य विषयाच्या विवेचनांत सांगतां न येणाच्या कांहीं गोष्टींचा खुलासा करण्यास प्रस्तावनेखेरीज दुसरा मार्ग नाहीं. पैकीं पहिली गोष्ट स्वतः ग्रंथकारासंबंधीं होय. भगवद्गीतेचा व आमचा प्रथम परिचय होऊन आज सुमारें त्रेचाळीस वर्षे झालीं. इसवी सन १८७२ साली वडील शेवटच्या दुखण्यानें आजारी असतां भगवद्गीतेवरील भाषाविवृति नांवाची प्राकृत टीका त्यांस वाचून दाखविण्याचे काम आमचेकडे आलें होतें. तेव्हां म्हणजे आमच्या वयाच्या सोळाव्या वर्षी गीतेचा भावार्थ पूर्णपणें लक्षांत येणे शक्य नव्हतं. तथापि लहान वयांत मनावर घडणारे सैस्कार टेिकाऊ असल्यामुळे भगवद्गीतबद्दल तेव्हां उत्पन्न झालेली आवड कायम राहून संस्कृताचा व इंग्रजीचा पुढे अधिक अभ्यास झाल्यावर गीतेवरील संस्कृत भाष्यें व दुसच्या टीका आणि इंग्रजींत व मराठींत अनेक पंडितांनी केलेलीं विवेचनेंहि वेळोवेळीं वाचण्यांत आलीं. परंतु स्वकीयांबरोबर युद्ध करणें हें मोठे कुकर्म म्हणून खिन्न झालेल्या अर्जुनास त्याच युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या गीतेंत ब्रह्मज्ञानानें किंवा भक्तीनें मोक्ष कसा भिळवावा याचे, म्हणजे नुस्त्या मोक्षमार्गाचे, विवेचन कशाला, ही शंका मनांत येऊन तीच उत्तरोत्तर बळावत चालली. कारण, गीतेवरील कोणत्याहि टीकेंत त्याचे योग्य उत्तर आढळून येईना. आमच्याप्रमाणे दुस-यांना हीच शंका आली असेल, नाही असें नाही. पण टीकांतच गुंतून राहिलें म्हणजे, टीकाकारांनीं दिलेलें उत्तर समाधानकारक न वाटलें तरी त्याखेरीज दुसरें उत्तर सुचत नाहींसें होतें. म्हणून सर्व टीका व भाष्यें बाजूला ठेवून नुस्त्या गीतेचींच स्वतंत्र विचारपूर्वक आम्हीं अनेक पारायणें केली. तेव्हां टीकाकारांच्या छापेंतून सुटका होऊन मूळ गीता निवृतिपर नसून कर्मयोगपर अह, नी गीतेंत ‘योग’ हा एकेरी शब्दच ‘कर्मयोग’ या अर्थी योजिलेला आह; असा झाला; व महाभारत, वेदान्तसूत्रे, उपनिषदें आणि वेदान्तशास्रावरील इतर संस्कृत व इंग्रजी ग्रंथांच्या अध्ययनानेंहि तेंच मत दृढ होत जाऊन, तं लोकांत प्रसिद्ध