पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवदा. १३ वरून आपलाच संप्रदाय खरा ठरतो, इतर संप्रदाय या धर्मभ्रंथांस संमत नाहीत, असें सिद्ध करून दाखविणें प्राप्त झाले. कारण, आपल्या संप्रदायाखेरीज दुसरा मार्गहि प्रमाणभूत धर्मग्रंथांतून ग्राह्य धारलेला आहे असें कबूल केल्यास, आपल्या संप्रदायाची महती त्या मानानें कमी होत्ये; व तसें होणे कोणत्याहिं संप्रदायास इष्ट नसतें. सांप्रदायिकदृष्टया प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिण्याचा हा प्रघात सुरू झाल्यावर निरनिराळे पंडित आपआपल्या संप्रदायांतील भाष्यांच्या आधारेंच आपल्या टीकांतून गीतार्थ प्रतिपादन करूं लागले,आणि त्या त्या संप्रदायांत त्या त्या टोकाच अधिक मान्य होत गेल्या. गीतेवर हल्ला जी भाष्यें किवा टीका उपलब्ध आहेत त्या बहुतेक सर्व अशाच प्रकारच्या म्हणजे निरानराळया सांप्रदायिक आचार्याच्या किवा पंडितांच्या आहेत; व त्यामुळे मूळ भगवद्रोतंत एकच अर्थ सुबोध रांतीनें प्रतिपादिला असतांहि तीच गीता प्रत्येक संप्रदायाचे समर्थन करणारी अशी समजूत झालेली आहे. या सर्व संप्रदायांपैकीं पाहला म्हणजे आतप्राचीन संप्रदाय श्रीशंकराचार्याचा होय; व तत्त्वज्ञानदृष्टया तोच हिंदुस्थानांत बहुमान्य झालेला आहे. श्रीमदाद्यशंकराचार्य शालिवाहनशके ७१० मध्यें जन्मले व बातंसाव्या वर्षी त्यांनी गुहाप्रवेशकेला [शके ७१० ते ७४२]:ः असें सध्यां ठरविण्यांत आले आहे. आचार्य हे एकमेोठे अलौकिक ज्ञानी असून त्यांनी आपल्या दिव्य सामथ्र्याने त्या वेळी चोहॅीकडे माजलेल्या जैन व बौद्ध मतांचे खंडण करून आपलें अद्वैत मत स्थापित केलें; व श्रौतस्मार्त वैदिकधर्माच्या संरक्षणार्थ भरतखंडाच्या चारी दिशांस चार मठ उभारून निवृतिपर वैदिक संन्यासधर्म किवा संप्रदाय त्यांनी कलियुगांतपुनः सुरू केला, ही कथा सर्वविश्रुत आहे. कोणताहिं धार्मिक संप्रदाय धतला तरी त्याचे स्वभावतःच दोन भाग होतात; पहिला तत्त्वज्ञानाचा व दुसरा आचरणाचा.पहिल्यांत पिंडब्रह्मांडाच्या विचारांनी परमेश्वरस्वरूप काय निष्पन्ने होतें तें सांगून मोक्ष कशाला म्हणावें याचा शास्रदृष्टया निर्णय केलेला असते; व दुसन्यांत तो मोक्ष मिळण्यास साधन किवा उपाय म्हणून मनुष्यानें या जगांत कसें वागलें पाहिजे थाचे निरूपण असतं. पैकी पहिल्या म्हणजे तात्त्विक दृष्टया पाहिलें तर श्रीशंकराचार्याचे असें म्हणणे आहे कीं,(१) मी, तूं किंवा मनुष्याच्या डोळ्यांस दिसणारें जगत् -म्हणजे सृष्टींतील पदार्थोंचे नानात्व-खरें नसून या सर्वात एकच शुद्ध व नित्य परब्रह्म भरलेले आहे, आणि त्याच्या मायेनें मनुष्याच्या इंद्रियांस नानात्वाचा भास होत असतो; तसेंच (२) मनुष्याचा आत्माहिं मूळांत परब्रह्मरूपीच असतो; आणि (३) आत्म्याच्या व परब्रह्माच्या या ऐक्याचे पूर्ण ज्ञान म्हणजे अनुभवात्मक

  • आमच्या मर्त श्रीमृदाद्यशंकराचार्याचा काल आणखी शंभर वर्षे मागें ओढला पाहिजे त्याबद्दलचा आधार परीशिष्टप्रकरणांत दिला आहे तो पहा.