पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ गातारहस्य अथवा कर्मयोग शब्दांचा कित्येकदां समानार्थी उपयोग करण्यांतयेते खरा; पण सामान्यत:‘टीका’ म्हटली म्हणजे त्यांतमूळ ग्रंथाचा सरळ अन्वय सांगून त्यांतील शब्दांचा अर्थसुगम केलेला असतो; आणि भाष्यकारतेवढ्यावरच संतुष्ट न रहातां, एकंदर ग्रंथाचे न्यायरीत्या पर्यालोचन करून आपल्या मतं त्यांतील तात्पर्य काय व तदनुसार ग्रंथाचा अर्थ कसा लावावा, हें सांगत असतात. गीतेवरील शांकर भाष्याचे स्वरूप याच प्रकारचे आहे. पण गीतातात्पर्यनिरूपणांत आचार्यांनी जेो फरक केला त्यांतील बीज लक्षांत येण्यास पूर्वीचा थोडासा इतिहास येथे सांगितला पाहिजे. वैदिक धर्मकेवळ तांत्रिक नसून या धर्मातील गृढ़तत्त्व काय याबद्दल प्राचीन काळांच उपनिषदांतून सूक्ष्म विचार झालेले आहेत. परंतु हीं उपनिषदं निरनिराळ्या ऋषींनी निरनिराळ्या वेळीं निरूपिलीं असल्यामुळे त्यांत अनेकतन्हेचे विचार आलेले असून त्यांपैकी दिसण्यांत कांहीं परस्परविरुद्धहि अहित. हा विरोध काढून टाकून बादरांयणाचार्यांनी आपल्यावेदान्त सूत्रांत सर्व उपनिषदांची एकवाक्यता केलेली आह; व त्यामुळे उपनिषदांइतकांच वेदान्तसूत्रेहि या बाबतीत प्रमाण धरिली जातात. यावेदान्तसूत्रांसच ‘ब्रह्मसूत्रं'किवा ‘शारीरकसूत्रे' अशी दुसरी नांवें आहत. तथापि वैदिकधर्मातील तत्त्वज्ञानाचा विचार एवढ्यानं पुरा होत नाही. कारण,उपनिषदांतील ज्ञान प्रायः वैराग्यपर म्हणजे निवृतिपर असून,वेदान्तसूत्रे उपनिषदांची एकवाक्यता करण्यासाठींच राचलेली असल्यामुळे त्यांतहिवैदिक प्रवृतिमार्गाचें कोठेच सविस्तरतात्त्विक प्रतिपादन केलेलें नाहीं. म्हणून, वर सांगितल्याप्रमाणें प्रवृत्तिमार्गप्रतिपादक भगवद्गीतेनें वैदिकधर्मतत्त्वज्ञानांतील ही उणीव जव्हांप्रथम भरून काढिली, तेव्हां उपनिषदें व वेदान्तसूत्रे यांतील धार्मिक तत्वज्ञानाची पूर्तता करणारा ग्रंथ या नात्यानें भगवद्गीता ही त्यांच्याइतकीच सर्वमान्य व प्रमाणभूत झाली; आणि अखेर उपनिषदें, वेदान्तसूत्रे व भगवद्गीता यांस ‘प्रस्थानत्रयी’ असें नांव प्राप्त झालें, ‘प्रस्थानत्रयी’ म्हणजे निवृत्ति व प्रवृति मिळून दोन्ही मार्गाचे पद्धतशीर व तात्त्विक विवेचन करणारे वैदिक धर्माचे तीन मुख्य आधारभूत ग्रंथ किंवा खांब होत. भगवद्रीतेचा याप्रमाणें प्रस्थानत्रयींत समावेश होऊन या प्रस्थानत्रयीचे साम्राज्य एकदां स्थापित झाल्यावर जें धर्ममत या तीन ग्रंथांस धरून नाही,किंवा या तिहींत ज्या मताचा समावेश करितां येत नाहीं, तें मत अगर संप्रदायवैदिक धर्मातील लोक गौण व अग्राह्य मार्नू लागले. याचा अखेर असा परिणाम झाला कीं, अद्वैत,विशिष्टाद्वैत, द्वैत, शुद्धाद्वैत आणि त्यांनं जोडून संन्यास किंवा भाक्त वगैरे वैदिक धर्माचे जे जे संप्रदाय बौद्ध धर्माच्या न्हुासानंतर हिंदुस्थानांत प्रचालत झाले, त्यांपैकीं प्रत्येक संप्रदायाच्या प्रवर्तक आचायाँस प्रस्थानत्रयीच्या तिन्ही भागांवर (अर्थात् भगवद्गीतेवराह) भाष्वें लिहून, हे सर्व संप्रदाय निघण्यापूर्वीच धर्मग्रंथ म्हणून प्रमाणभूत झालेल्या या तिन्ही ग्रंथां