पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3. o र्गोतारहस्य अथवा कर्मयोग. म्हटले आहे. यावरून ‘ हरिगीता' शब्दानें,भगवद्गीताच था ठिकाणी विवक्षित आहे याबद्दल कांहींच संशय रहात नाही. गुरुपरंपरा एकच असून शिवाय गीतेंत प्रतिपाद्य म्हणून स्पष्टपणे दोनदां वर्णिलेला जेा हा भागवत किवा नाराथर्णीय धर्म त्यासच ‘सात्वत' किंवा “एकांतिक धर्म अशा दुसरी नावें आहेत; आणि त्याचे निरूपण चालू असतां- ہج؟ с حمي e नारपूयणपरो धूमः पुनूरात्रुतिदुर्लभः । प्रवृत्तिलक्षणश्चेंव धमां नारायणात्मकः । “हा नारायणीय धर्म पुनर्जन्म टाळणारा म्हणजे पूर्ण मोक्षप्रद असून तेो प्रवृतिपरहि आहे,”-असें त्याचे दुहेरी लक्षणदेऊन (शां.३४७.८०,८१), नंतर हा धर्म प्रवृतिपर कसा थाचा महाभारतांत पूर्ण खुलासा केलेला आहे. प्रवृति म्हणजे संन्यास न घेतां आमरणान्त चातुर्वण्थैविहित निष्काम कर्मच करीत राहणें हा अर्थ प्रासद्ध आहे. म्हणून गीतेंत अर्जुनास केलेला उपदेश भागवतधर्माचा असून सदर धर्म प्रवृतिपर असल्यामुळे तो उपदेशहि महाभारतकार प्रवृतिपरच समजतात, हें उघड होतें. तथापेिं केवळ प्रवृतिपर भागवतधर्मच गीतेंत आह असें नाही; तर हा भागवतधर्म आाणि यतीनां चापि ये धर्मेः स ते पूर्वॆ नृपोत्तम । कथिती ह्ररिगीतासु समासविधिकिल्पितः । “त्याबरोबरच [चापि] यतींचा म्हणजे संन्याश्यांचा निवृतिपर धर्महूि, हे राजा तुला पूर्वी भगद्गीतंत विधासह संक्षेपानें कथन केला आहे,”-असें वैशंपायनानें जनमेजयास पुनः सांगितले आहे (मभा. शां. ३४८.५३). परंतु प्रवृतिधर्माबरोबरच यतींचा निवृतिपर धर्महि गीतेंत याप्रमाणें जरी सांगितला असला, तरी मनु-इक्ष्वाकु इत्यादि गीताधर्माची जी परंपरा गीतेंत दिला आहे ती यतिधमास बिलकुल लागू पडत नाही; फक्त भागवतधर्माच्या परंपरेशीं मात्र जुळत्थे. यासाठी गीतेंत अर्जुनास केलेला उपदेश मुख्यत्वेंकरून मनु-इक्ष्वाकु इत्यादि परंपरेनें चालत आलेल्या प्रवृतिपर भागवतधर्माचा असून त्यांत अनुषंगानें निवृतिपर यतिधर्माचे निरूपण आलेले आहे, असा महाभारतकारांचा अभिप्राय असल्याचे वरील एकंदर वचनांबरून निष्पन्न होतें. महाभारतांतील हा प्रवृतिपर नारायणीय धर्म आणि भागवतपुराणांतील भागवत धर्म मूळांत एकच आहेत असें पृथु, प्रियव्रत, प्रह्लाद वगैरे भगवद्भक्तांच्या ཟླ་ཧྥུ་ཏཱ་ किंवा अन्यत्र भागवतांत निष्काम कमीचीं जां वर्णनें आहत त्यांवरून स्पष्ट हुँोतें. ( भागवत ४.२२.५१,५२;७. १०. २३ व ११.४.६पहा). परंतु भागवतधर्मातील कर्मपर प्रवृत्तितत्त्वाचे समर्थन करणें हा ੰ