पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवेइा. w. आहेत म्हटले तरी चालेल. म्हणून खुद्द महाभारतकारांच्या मतें गीतेचे तात्पर्य काय तें प्रथम थोडक्यांत सांगतों.

  • भगवद्गीता ? किंवा “ भगवंतांनीं गाइलेलें उपनिषत् ’ या नांवावरूनच गीतेंत अर्जुनास केलेला उपदेश प्राधान्येंकरून भागवत-म्हणजे भगवंतांनीं प्रवृत्त केलेल्या-धर्माचा असावा असें दिसून येतें. कारण, श्रीकृष्णास ‘श्रीभगवान्’ हें नांव प्रायः भागवतधर्मातच देत असतात. हा उपदेश नवा नसून पूर्वी हाच उपदेश भगवंतांनीं विवस्वानास, विवस्वानानें मनूस आणि मनूनें इक्ष्वाकूस केला होता, असें गीतेच्या चव्रथ्या अध्य्याच्या आरंभींचू (गी. ४. १-१) म्हटले असून, महाभारतांत शांतिपर्वाचे अखेर नारायणीय किंवा भागवत धर्माचे जें सविस्तर निरूपण आहे त्यांत ब्रह्मदेवाच्या निरनिराळ्या जन्मांत, म्हणजे कल्पांतरीं, भागवतधमीची परंपरा कोणती थाचे वर्णन कल्यावर, अखेर ब्रह्मदेवाच्या हल्लींच्या जन्मांतील त्रेतायुगांत- ১

चॆतायुग्दॊ च तृती विव्स्वान् मनवे ददौ । मनुश्व लोकभृत्यर्थ सुतायेक्ष्वाकंवे ददौ । इक्ष्वाकुणा च कथितो व्याट्य लोकानवस्थितः । “हा भागवतधर्म विवस्वान-मनु-इक्ष्वाकु या परंपरेनें प्रसृत झालेला आहे” असें सांगितले आहे (मभा. शां. ३४८,५१,५२). या दोन्हीं परंपरा एकमेकूीशी जुळतात (गीता ४.१ वरील आमची टीका पहा); आणि दोन भिन्न धर्माची परंपरा एक असणें ज्याअर्थी शक्य नार्हt, त्याअर्थी गीताधर्म व भागवतधर्म एकच असले पाहिजेत असें परंपरेच्या या ऐक्यावरून सहज अनुमान होतें. पण ही गोष्ट केवळ अनुमानावरच अवलंबून आहे असें नाहीं. कारण, नारायणीय किंवा भागवतधर्माचे जें हें निरूपण महाभारतांत आहे त्यांतच एवूमेष् महून् घर्मः स ते पूर्ड् ऋषीन्म । कथितो इरिगीतासु समासविधिकिल्पित: । “हे नृपश्रेष्ठ जनमेजया ! हाच मेाठा भागवतधर्म, त्यांतील विधींसह संक्षेपानें सदर हरिगोतंत म्हणजे भगवद्गीतेंत पूर्वी तुला सांगितला आहे”(मभा.शां.३४६. १०),-असें वैशंपायनानें जनमेजयाजवळ गीतेच्या तात्पर्याचे वर्णन केले आहे. आणि एक अध्याय सोडून पुढील अध्यायांतू नारायणूीय धर्माची ही माहिती समुपोढेष्वनीकेषु कुरुपांडवयेोर्मृधे । अर्जुने धिमनस्कें खं गीता भगवत। स्वयम् ॥ “कौरवपांडवांच्या युद्धांत दोन्हीं सैन्यें सज असतां अर्जुन विमनस्क म्हणजे उद्विम झाल्यावर त्यास भगवंतांनीं सांगितली ” (मभा. शां. ३४८. ८),-असें स्पष्ट