पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रविश \o कशंf आहे, काव्यदृष्टया त्यात माधुर्य किवा प्रसाद हा गुण कितपत वठला आहे, ग्रंथा तील शब्दरचना व्याकरणशुद्ध आहे किंवा त्यांत कांहीं जुने आर्ष प्रयोग आहेत, अगर कोणकोणत्था मतांचा, स्थलांचा किंवा व्यक्ताचा त्यांत उल्लेख केलेला आहे, व त्यावरून ग्रंथाचा कालनिर्णय करण्यास अथवा तत्कालीन समाजस्थिति समजण्यास कांहा साधन मिळतें कीं नाहीं, ग्रंथांतील विचार स्वतंत्र आहेत की दुसच्यापासून घेतलेले आहत, व दुस-यापासून घेतलेले असल्यास केोठून व कोणत, इत्यादि केवळ बाह्यांगांचे विवेचन करणे यास ‘बहिरंगपरीक्षण ’ असें ह्यणतात. गीतेवर ज्या प्राचीन पंडितांनी भाष्यें व टीका केलेल्या आहेत त्यांनी या बाह्य गोष्टांकडे विशेष लक्ष पुरविले नाही. कारण, भगवद्गीतेसारख्या अलौकिक ग्रंथाचे परीक्षण करितांना असल्या गोष्टीकडे लक्ष पुरविणे म्हणजे त्यांच्या मतें एखादें उत्तभ पुष्प नजरेस पडलें असतां त्याच्या सुवासाचे,रंगाचे व सोदर्थाचे कौतुक न करितां केवळ त्याच्या पाकळ्या मोजण्यांत, किंवा मधानें भरलेलें पोळे हातांत पडले असतां त्यांतील छिद्रांची चर्चा करण्यांतच वेळ दवडण्यासारखें होय: परंतु पाश्चिमात्यांच्या अनुकरणानें आधुनिक विद्वानांनी गीतेच्या बाह्यांगाचाहिं आतां बरीच चर्चा चालविली आहे. गीतेमध्यें आर्ष प्रयोग किती आहेत हें पाहून एकानें असें ठरविलें आहे का, हा ग्रंथ येशू ख्रिस्त जन्मण्यापूर्वी कांहीं शतकें तरी निर्माण झाला असावा. अर्थात् गीतेतील भक्तिमार्ग तदुत्तरकालीन प्रवृत्त झालेल्या ख्रिस्ती धर्मातून घेतला असावा, ही शंकाच निर्मूल होय. दुसयानें, गीतेच्या सोळाव्या अध्यायांत ज्या नास्तिक मतांचा उल्लेख आहे तां प्रायः རྨེ་ཧྰུཾ་ धर्माची असावीं असें कल्पून, बुद्धानंतर गतिा झाली असावी असे म्हटले अहिं. तिसरा असें म्हणतो कीं, तेराव्या अध्यायांतील ‘ ब्रह्मसूत्रपदैचैव०’ या श्वलोकांत ब्रह्मसूत्रांचा उल्लेख असल्यामुळे ब्रह्मसूत्रानंतर गीता झाली असावीं. उलटपक्षीं, ब्रह्मसूत्रांत कांहीं कांहीं ठिकाणीं तरी गीतेचा आधार निःसंशय घेतलेला असल्यामुळे गीता तदुतरकालीन मानितां येत नाहीं, असेंहि कित्येकांचे म्हणणें आहे. दुसरे कित्येक असें म्हणतात कीं, भारतीय युद्धांत रणभूमीवर सातशें श्लोकी गीता अर्जुनास सांगण्यास अवकाश मिळणे शक्य नव्हतें. लढाईच्या घाईत फार झाले तर पांचपन्नास मुद्दथाचे श्वलोक किंवा त्यांचा अर्थ त्या वेळी श्रीकृष्णार्ना अर्जुनास सांगितला असावा व त्याचाच विस्तार, ही कथा संजयानें धृतराष्ट्रास, व्यासानें शुकास, वैशंपायनानें जनमेजयास वपुढे सूतानें शौनकास सांगतांना, अगर अखेरीस मूळ भारताचे ज्यांनी ‘महाभारत' बनविलें त्यांनीं, केला असावा. गीता ग्रंथाच्या रचनेसंबंधानें मनाची एकदां अशी समजूत झाल्यावर गीतासागरांत बुडथा मारमारून केाणीं सात* तर कोणीं

  • हल्लीं एक सप्तश्नोकी गीता प्रसिद्ध असून तींत (१) अ* इत्येकाक्षरं ब्रह्म ई० (गी. ८ o, स्थाने हृषीकेश तव (गी. $o. (३) सर्वतः पाणिपादं तत् ?