पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ गीतारहस्य अथवा कर्मयेोग. निर्माण झाल्या आहत, असें म्हटलें तरी चालेल. भगवद्गीतेंत ज्याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनास विश्वरूप दाखवून ज्ञान सांगितलें तसेंच शिवगीता, देवगीता, गणेशगीता यांत वर्णन आहे; आणि शिवगीता, ईश्वरगीता वगैरेमधून भगवद्गीतेचे बरेचसे लेक अक्षरशः आलेले आहेत. ज्ञानदृष्टया पाहिलें तर भगवद्गीतेपेक्षां या गीतांतून कांहीं विशेष नसून अध्यात्मज्ञान व कर्म यांची जोड घालण्याची भगवद्गीतेची जी अपूर्व शैली ती तर यांपैका कोणत्याहि गीतंत आढळून येत नाही. भगवद्गीतेंत पातंजलयेाग किंवा हठयोग आणि कर्मत्यागरूप संन्यास यांचे यावें तसें वर्णन आलें नार्हा, असें कोणासतरी वाटून त्यानें कृष्णार्जुनांच्या संवादरूपानें भगवद्गीतेची पुरवणी म्हणून उत्तरगीता मागाहून रचिलेला आहे; आणि अवधूत, अष्टावक्र वगैरे कांहीं गीता निव्वळ एकदेशीय म्हणजे संन्यासमार्गाचेच प्रतिपादन करणाच्या असून यमगीता, पांडवगीता वगैरे दुसच्या कांही गीता स्तेात्रासारख्या अगदी संक्षिप्त व भक्तिपर आहेत. शिवगीता, गणेशगीता व सूर्यगीता यांचा प्रकार तसा नसून त्यांतून ज्ञानकर्मसमुच्चयाचे सयुक्तिक समर्थन केले आहे हें खरें; तथापि त्यांतील प्रतिपादन बहुतक भगवद्गीतेवरूनच घेतलेले असल्यामुळे त्यांत कांहीं नवेपणा वाटत नाही. म्हणून अखेर भगवद्गीतेच्या प्रगल्भ व व्यापक तेजापुढे मागाहून झालेल्या या पौराणिक शिळ्या गीतांचा टिकाव न लागतां, उलट भगवद्गीतेचीच महती या नकली गीतांना अधिक व्यक्त व स्थापित झाली; आणि ‘गीता’ या शब्दाचाच ‘भगवद्गीता’ असा अर्थ प्राधान्येकरून रूढ झाला. अध्यात्मरामायण व योगवासष्ठ हे ग्रंथ वेिस्तृत असल तरी ते मागाहूनचे हेत हें त्यांच्या रचनेवरूनच उघड होतं. मद्रासेकडील 'गुरुज्ञानवासिष्ठ-तत्त्वसारायण’ हा ग्रंथ कित्येकांच्या मतें फार प्राचीन आहे; पण आम्हांस तसें वाटत नाहf. कारण, त्यांत एकशेंआठ उपनिषदांचा उल्लेख असून ती सर्व प्राचीन आहेत असें मानितां येत नाही; आणि सूर्यगीता पाहिलीतर तिच्यांत विशिष्टाद्वैती मताचा उल्लेख सांपडतो (३.३०), व कांहीं ठिकाणचा कोटिक्रमहि भगवद्गीतेवरूनच घेतल्यासूारखा दिसतेो (१. ६८). म्हणून हा ग्रंथहि पुष्कळ ལཱ་ཨནྡྷ་རྩོམ༔ཀ། श्रीशंकराचार्यांच्याहि मागाहूंन-झाला असावा असे म्हणणें সাম गीता पुष्कळ असल्या तरी भगवद्गीतेचे श्रेष्ठत्व याप्रमाणें निर्विवाद असल्यामुळे इतर गीतांकडे फारसें लक्ष न देतां भगवद्गीतेचे परीक्षण करून त्यांतील तात्पर्य आपल्या धर्मबंधूंस सांगणें यांतच उत्तरकालीन वैदिकधर्मीय पंडित आपला कृतकृत्यता मानू लागले. ग्रंथाचे परीक्षण दोन प्रकारचे असतं; एक अतरंगपरीक्षण व दुसरं बहिरंमपरक्षिण. समग्र ग्रंथ अवलेोकन करून त्यांतील मर्म, रहस्य, मथितार्थे किंवा प्रमेय काढणें यास ‘अंतरंगपरक्षिण' हें नांव असून, ग्रंथ कोठे व कोणों केला, त्याची भाषा