पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवेश. ३ ल्यामुळे, नेहमींच्या पाठासाठीं महाभारतांतून गीता प्रथम जेव्हां निराळी काढण्यांत आली तेव्हांपासून, ह्मणजे गीतेवर कोणतीहि टीका होण्यापूर्वीच, तो प्रचारांत अालेला असावा असें अनुमान होतें; व या दृष्टीनें गीतातात्पर्याचा निर्णय करण्यायें कामीं त्याचे महत्त्व काय हें पुढे सांगण्यांत येईल. तूर्त संकल्पांतील ‘ भगवद्गीतासु उपनिषत्सु ” या दोन पदांचाच विचार कर्तव्य आहे. ' उपनिषतू’ हा शब्द मराठीत नपुंसकलिंगी असला तरी संस्कृतात तो स्रीलिंगी असल्यामुळे “श्रीभगवंतांनीं गाइलेलें ह्मणजे सांगितलेलें उपनिषत्” या अर्थी संस्कृतांत “ श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्” असे विशेषणविशेष्यरूप स्रीलिंगी दोन शब्द येतात; आणि ग्रंथ जरी एकच अग्नेह तरी सन्मानार्थी अनेकवचनानें त्याचा निर्देश करण्याची पद्धतअसल्यामुळे“श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु”असा सप्तम्यन्त बहुवचनी प्रयोग झालेला आहे.आचार्याच्या भाष्यांतूनहि याचप्रमाणें “इति गीतासु”असें या ग्रंथास अनुलक्षन बहुवचनी प्रयोग आलेले आहेत. पण संक्षेप करण्याचे वेळा आदरार्थक प्रत्यय किवोपदें आणि शेवटचा ‘उपनिषत् हा जातिवाचक सामान्य शब्दहि गाळून केन, कठ, छांदोग्य, या संक्षिप्त नांवांप्रमाणे “ श्रीमद्भगवद्गीता उपनिषत् ” या दोन प्रथमान्त एकवचनी शब्दांचे प्रथम ‘ भगवद्गीता’ व पुढे नुस्तें ‘गीता’ असें स्रीलिंगी अतिसंक्षेपरूप झालेले आहे. ‘ उपनिषत्’ हा शब्द जर भूळच्या नांवांत नसता, तर भागवतम्, ‘ भारतम्, ’ ‘गोपीगीतम्' या शब्दांप्रमाणें या ग्रंथाचे नांव ‘भगवद्गीतम्’ किंवा नुस्तें ‘गीताम् ? असें नपुंसकलिंगी बनलें असतें. तसें न होतां ‘भगवद्गीता ? किंवा “ गीता ’ असा स्रीलिंगी शब्दच ज्या अर्थी कायम राहिला आहे त्या अर्थी त्यापुढे ‘उपनिषत्’ हा शब्द नेहमींच अध्याहृत समजला पाहिजे. अनुगीतेवरील अर्जुनमिश्राच्या टीकेंत * अनुगीता’ या शब्दाचा अर्थहि याचप्रमाणें केलेला आहे. परंतु ‘ गीता’ हा शब्द सातशें श्लोकी भगवद्गीतेसच लागत नसून रूढार्थी तो दुस-यांहि अनेकज्ञानपरग्रंथांस लाविलेला आढळून येते. उदाहरणार्थ, महाभारतांतील शान्तिपर्वान्तर्गत मोक्षपर्वाच्या कांहीं फुटकळ प्रकरणांस पिंगलगीता, शंपाकगीता मंकिगीता, बोध्यगीता, विचख्युगीता, हारीतगीता, वृत्रगीता, पराशरगीता, व हंसगतिा' अशीं नांवें दिलेली असून अश्वमेधपर्वातील अनुगीतेच्या एका भागास ‘ब्राह्मणगीता, अशी निराळी विशिष्ट संज्ञा आहे. याशिवाय अवधूतगीता, अष्टावक्रगाता, ईश्वरगतिा, उत्तरगीता, कापलगीता, गणेशगीता, देवींगीता, पांडवगीता, ब्रह्मगाता, भिक्षुगीता, यमगीता, रामगीता, व्यासगीता, शिवगीता, सूतगतिा, सूर्यगीता वगैरे दुसच्याही अनेकगीता प्रसिद्ध आहेत. यांपैकीं कांही स्वतंत्ररीत्या निरूपिलेल्या असून बाकीच्या निरनिराळया पुराणांतून आलेल्या आहेत. उदाहरणार्थ, गणेशगीता ही गणेशपुराणाच्या अखेर क्रीडाखंडांत १३८ ते १४८ अध्यायांत आलेली असून ती