पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

있 गीताहरस्य अथवा कर्मयोग दिवस श्रीकृष्णांस अशी विनंति केली कीं, “युद्धारंभीं तुम्ही केलेला उपदेश मी विसरलों; मला तो कृपा करून फिरून सांगा.” तेव्हां, “सदर उपदेश त्या प्रसंगीं अत्यंत येागयुक्त चित्तानें केला असल्यामुळे तो पुनः तसाच सांगणें मलाहि अशक्य आह!” असें भगवंतांनी त्यास उत्तर दिलें, म्हणून अनुगीतेच्या आरंभी म्हटलें आहे (मभा. अश्वमेध. अ. १६ *टी. १०-१३).वास्तविक पाहिलें तर, भगवंतांस अशक्य असें कांहीच नाही; पण त्यांनी सुद्धां गीता पुनः सांगणे अशक्य म्हणावें, यावरून गीतेची थोरवी केवढी मेोठी आहे हें मात्र चांगलेंव्यक्त होतें. वैदिकधर्मातोल भिन्नभिन्न संप्रदायांस वदांप्रमाणे हा ग्रंथ आज सुमारं अडीच हजार वर्ष, -सवोस एकसारखाच-मान्य व प्रमाणभूत होऊन बसला आहे, यांतील बीजहिं हॆच अमृन, याच कूरशूास्तव्– . . - सर्वोपनिषदे गावो दोग्धा गोपालनंदनः । पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् । “सर्व उपनिषदं याच कोणी गायी, भगवान् श्रीकृष्ण हे स्वतः दूध काढणार (गवळी), बुद्धिमान् अर्जुन हा (त्था गायसि पान्हा आणणारा) भोक्ता वत्स, आणि (अशा अपूर्व सामग्री जुळन आल्यावर )जें दूध काढिलें तेंच हें मेोठे गीतामृत,”-असें या स्मृतिकालीन ग्रंथाचे गीनाध्यानांत अलंकारयुक्त पण यथार्थ वर्णन केले आहे. हिदुस्थानांतील सर्व प्राकृत भाषांत याची अनेक भाषांतरें, टीका अथवा निरूपणे झालीं आहत यांत कांहीं आश्चर्थ नाही; पण पाश्चिमात्यांस संस्कृताची ओळख झाल्यानंतर ग्रीक, लंटिन, जर्मन, फ्रेंच, इंग्रजी वगैरे त्यांच्या भाषांतूनहि गीतचा अनेक भाषांतरें होऊन या अप्रतिम ग्रंथाची प्रसिद्धि आज सर्व जगभर झालेली आह. सर्व उपनिषदांचे सार या ग्रंथांत आलें आह इतकेंच नव्हे, तर या ग्रंथाचे पुरं नांवहिं ‘श्रीमद्भगवद्गीता-उपनिषतू' असे आह. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी अध्यायसमाप्तिदर्शक जो संकल्प असते त्यांत“इति श्रीमद्भगवद्गतिासूपानीषत्सु ब्रह्मविद्यायां येोगशास्ने श्रीकृष्णार्जुनसंवादे ” इत्यादि शब्द असतात. हा संकल्प मूळ भारतांत जरी दिलेला नाही, तरी गीता ग्रंथाच्या सर्व प्रतींत तो आढळून येत असत्याचेच पुढे अजुन व श्रीकृष्ण हे दोन अवतार झाले, असें महाभारतांत वर्णन आहे (मभा. उ.४८.७-९व२७-२२: आणि वन. १२:४४-४६.). यानींच नि नारायणीय किंवा भागवत धर्मप्रथम प्रवृत्त केला असल्यामुळे सवै भागवतधर्मीय ग्रंथांत आरंभूीं यांसचं नमन् कलेलें असते. या श्लोकात व्यासाचे नॉव कांहीं ठिकाणींगाळून त्याबद्दल * चैव' असा पाठ येत असतो; पण आम्हांस तमे करणे बरे वाटत नाहीं, कारण, नर्नारायणऋषींनीं भाग्वतधर्म जूरी प्रवृत्त केला आहे, तरी भारत व गीता असे जे या धर्माचे दोन मुख्य ग्रंथ ते ज्यांनी लिहिले त्या व्यासांसहि आरंभीं नमन करणें आमच्या मतें योग्य आहे. * जय 'हें महाभारताचे प्राचीन नांव आहे (मभा. आ. ६२.२०).