पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*× गीतारहस्य अथवा कर्मयोग गीतेचा स्पष्ट सिद्धान्त-संन्यासमागीय टीकाकारांनी केलेला विपर्यास--त्यावर उत्तर--अर्जुनास अज्ञानी मानितां येत नाहीं (पृ. ३०९)-कर्मयोगच श्रेष्ठ कां याबद्दल गीतेंत सांगितलेली कारणें--आचार अनादि कालापासून द्विविध, म्हणून श्रेष्ठत्वाचा निर्णय करण्यास अनुपयोगी--जनकाच्या तीन व गीतेंतील दोन निष्ठा--कर्मे बंधक म्हटल्यानें सोडावींच असें सिद्ध होत नार्हा, फलाशा सोडिल्यानें नेिर्वाह होतो--कर्म सोडणे अशक्य---कर्म सोडिलें तर खावयाला देखील मिळणार नाहीं--ज्ञानोत्तर स्वतःचे कर्तव्य न राहिलें, किवा वासनाक्षय झाला, तरी कर्म सुटत नाहीं--म्हणून नि:स्वार्थबुद्धीनें ज्ञानोत्तरहि कर्म करणे अवश्य--भगवंतांचे व जनकाचे उदाहरण -फलाशात्याग, वैराग्य व कर्मोत्साह (पृ.३२६)-लोकसंग्रह व त्याचे लक्षण--हेंच ब्रह्मज्ञानाचें खरें पर्यवसान--तथापि तो लोकसंग्रहहिं चातुर्वण्र्यव्यवस्थेप्रमाणे व निष्काम(g.३३४)--स्मृतिग्रंथांत वर्णिलेला चार आश्रमांचा आयुष्यक्रमणाचा मार्ग -गृहस्थाश्रमाचे महत्त्व--भागवतधर्म-भागवत व स्मार्न यांचे मूळचे अर्थ-गीतेत कर्मयोग म्हणजे भागवतधर्मच प्रतिपाद्य--गीतेंतील कर्मयोग व मीमांसकांचा कर्ममार्ग यांमधील भद--स्मार्त संन्यास व संन्यास यांतील भेद--दोहोंची एकवाक्यता--मनुस्मृतींतील वैदिक कर्मयोग व भागवत धर्म यांचे प्राचीनत्व--गीतेंतील अध्यायसमाप्तिसूचक संकल्पाचा अर्थ--गीतेची अपूर्वता व प्रस्थानत्रयीच्या तीन भागांची साथैकता(पृ. ३५०)-संन्यास(सांख्य) व कर्मयोग (योग) या दोन मार्गातील भेदाभेदाचे कौष्टकरूपानें संक्षिप्त निरूपण-आयुष्यक्रमणाचे निरनिराळे मार्ग--सर्वात कर्मयोगच श्रेष्ठ असा गीतेचा सिद्धान्त-तत्प्रतिपादक ईशावास्योपनिषनांतील मंत्र-त्यावरील शांकरभाष्याचा विचार-मनु व इतर स्मृतींतील ज्ञानकर्मसमुच्चयात्मक वचनें. 陳 受 8 g. २९८-३६ ३ • प्रकरण बारावें--सिद्धावस्था व व्यवहार. समाजाची पूर्णावस्था-पूर्णावस्थेत सर्वच स्थितप्रज्ञ-नीतीची परमावधिपाश्चिमात्य स्थितप्रज्ञ---स्थितप्रज्ञाची विधिनियमांपलीकडची स्थिति--कर्मयोगी स्थितप्रज्ञाचे वर्तन हीच परम नींति- पूर्णावस्थेतील परमावधीची नीति व लोभी समाजांतील नीति यांमधील भेद-दासबोधांतील उत्तम पुरुषाचे वर्णन-परंतु या भेदानें नीतिधर्माचे नित्यत्व कमी होत नाहीं (पृ. ३७६)-स्थितप्रज्ञ हे भेद कोणत्या धोरणावर करितो-समाजाचे श्रेय, कल्याण किंवा सर्वभूतहित-तथापि या बाह्य धोरणापेक्षां साम्यबुद्धीच श्रेष्ठ-पुष्कळांचे पुष्कळ हित व साम्यबुद्धि या तत्त्वांची तुलना-साम्यबुद्धीनें जगांतील वागणूक-परोपकार आणि स्वतःचा