पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःखविवेक १२१ कर्मयोगशास्रांत अखेर सिद्धांत केला आहे. कांही झाले तरी दृश्य सृष्टीपलीकडील तत्त्वज्ञानांत शिरावयाचेच नाहीं अशी ज्यांनीं शपथ वाहिली असेल त्यांची गोष्ट निराळी. एरर्वी मन आणि बुद्धि यांच्याहि पलीकडे जाऊन नित्य आत्म्याचे नित्य कल्याणच कर्मयेोगशास्रांतहि प्रधान मानिले पाहिजे, असें युक्तीनेंहि प्राप्त होतं. वेदान्तांत शिरलें म्हणजे सर्वच ब्रह्ममय होऊन व्यवहाराची उपपति लागत नाहीं अशी जी कित्येकांची समजूत आहे ती चुकीची आह. वेदान्तावरील हल्लीं सामान्यतः वाचण्यांतयेणारे ग्रंथ संन्यासमार्गाच्या अनुयायांनीच लिहिलेले असल्यामुळे आणि संन्यासमार्गास तृष्णारूपी संसार सर्वच निःसार वाटत असल्यामुळे त्यांच्या ग्रंथांत कर्मयोगाची उपपात नीटू दिलेली नाही हें खरें. किंबहुना या परसंप्रदायासहिष्णु ग्रंथकारांनी संन्यासमार्गौतील कोटिक्रम कर्मयोगांत घुसडून देऊन संन्यास व कर्मयोग हे दोन स्वतंत्र मार्ग नसून संन्यास हाच काय तेो एक शास्रोक्त मोक्षमार्ग, असाहि समज उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे; पण हें मत खरे नव्हे. संन्यासमागीप्रमाणे कर्मयोगमार्गहि वैदिक धर्मात अनादि कालापासून स्वतंत्रपणें चालत आला आह; आणि या मार्गाच्या प्रवर्तकांना वदान्ताचीं तत्त्वें न सोडितां कर्मयोगशास्त्राची उपपात नीट लाविली आह. भगवद्गीता ग्रंथ याच पंथाचा आह. तथापिगीता सोडून दिली तरी कार्याकार्थशास्त्राचे अध्यात्म दृष्टया विवेचन करण्याची पद्धत खुद्द इंग्लडांतहिं ग्रीनसारख्या ग्रंथकाराना सुरू केलेली आहे; * व जर्मनींत तर ग्रीनच्याहिं अगोदर ती सुरू झालेली होती. दृश्य सृष्टीचा किती जरी विचार केला तरी ही सृष्टि पहाणारा व कर्म करणारा केाण हें जॉपर्यंत नीट कळले नाहीं तोंपर्यंत मनुष्याचे या जगांत परम कर्तव्य काय याचा विचार तात्विकदृष्ट्या अपुराच रहाणार. मह्णून ‘‘अात्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यः’’ ह्रा जो याज्ञवल्क्याचा उपदेश तोच प्रस्तुत प्रकरणींहेि अक्षरशः लागू पडतो. दृश्य जगाचे परीक्षण करून जर परोपकारासारखंा तत्त्वेंच अखेरीस निष्पन्न होतात, तर अध्यात्मविद्येची महती त्यानें कमी न होतां उलट सर्वोभूती एकच आत्मा असल्याचा हा एक पुरावाच आह असें म्हटले पाहिजे. आधिभौतिकवादी स्वतःला स्वत:च घालून दिलेल्या मर्यादेपलीकडे जाऊं शकत नाहीं त्यास इलाज नाहीं. आमच्या शास्रकारांची दृष्टि याच्या पलीकडे गेलेली असून अध्यात्मदृष्टयाच कर्म कमौकर्मपरीक्षणाच्या दुसच्या एका पूर्वपक्षाचाहि थेोडा परामर्श घेणे जरूर असल्यामुळे त्या पंथाचें आता विवेचन करितो. + Poolegomena to othics, Book l; and Kant's Metaphysics of Morals (trans by Abbot in Kant's Theory of Ethics).